मध्य रेल्वे मुंबईद्वारे बल्लारपूर/चंद्रपूर करांशी पुन्हा एक धोका ?
११ एप्रिल पासून सुरू होणारी बल्लारशाह-मुंबई (व्हाया वर्धा) रेल्वे रद्द करण्यात आली
आता १० एप्रिल पासून बल्लारशाह-मुंबई (व्हाया नांदेड, औरंगाबाद) रेल्वे आठवड्यातुन २ दिवस धावेल
बल्लारशाह :- मार्च २०२० पूर्वी बल्लारशाह-वर्धा पेसेंजरला जोडून मुंबई करीता काही डब्बे असायचे जे नागपूर वरून येणाऱ्या सेवाग्राम एक्सप्रेस ला जोडून मुंबईला जायचे मात्र कोरोना संक्रमणाच्या काळात ती सेवा बंद झाली जी आताही बंद आहे. चंद्रपूर/बल्लारशाह हे शहर महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवरील महत्वाची शहर आहेत बल्लारशाह वरून मुंबई करिता थेट रेल्वे सोडण्याची मागणी ही बऱ्याच वर्षांपासून येथील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार सह रेल्वे च्या विविध समित्यांवर कार्यरत सदस्यांनी केली होती या मागणीवर रेल्वे बोर्डाने सकारात्मक प्रतिसाद ही दिला होता बऱ्याच वर्षांनंतर बल्लारशाह-मुंबई (व्हाया वर्धा) ही थेट रेल्वे सुरू होणार होती मात्र कुठं माशी शिंकली की काय? ऐन वेळेवर मध्य रेल्वे ने आपल्या निर्णयावर घुमघाव केले व ११ एप्रिल पासून सुरू होणारी बल्लारशाह-मुंबई (व्हाया वर्धा) ही रेल्वेच रद्द करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.
त्याऐवजी येत्या १० एप्रिल पासून रेल्वे आपल्या निर्णयात बदल करीत बल्लारशाह-मुंबई(व्हाया नांदेड, औरंगाबाद) मार्गाने रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला व त्यासंबंधीचा प्रस्ताव मध्य रेल्वे मुंबई ने दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद ला ३१ मार्च ला पाठविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त झाली आहे आधीच या मार्गाने नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस (कोरोना संक्रमण काळामुळे सद्यस्थितीत आदीलाबाद पर्यत) सुरू असतांना नवीन रेल्वे सुध्दा त्याच मार्गाने सुरू करण्याचे औचित्य काय? नागपूर-मुंबई बऱ्याच रेल्वे असताना सेवाग्राम एक्सप्रेस किंवा अमरावती-मुंबई रेल्वे चा विस्तार बल्लारशाह पर्यत केला असता तरी योग्य झाले असते जिथे बल्लारशाह ते मुंबई(व्हाया वर्धा) जाण्यासाठी १७ तास लागतात तिथेच व्हाया नांदेड, औरंगाबाद मार्गाने २४ तासात मुंबईला जायला वेळ लागतो विशेष म्हणजे सदर नवीन रेल्वे गाडी ही आठवड्यातून केवळ २ दिवस धावणार आहे. सदर रेल्वे ही मुंबई वरून रविवार व मंगळवार ला रात्री ९:४५ ला सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७:५० ला बल्लारशाह येथे पोहोचेल तसेच बल्लारशाह वरून हीच रेल्वे रात्री ९:३० ला सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९:५० ला दादर(मुंबई) येथे पोहोचेल. बल्लारशाह येथे निर्माण होत असलेलं पिट लाईनच काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे सदर रेल्वे रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्राकडून मिळाली आहे विशेष बाब म्हणजे बल्लारशाह-दादर(मुंबई) ही रेल्वे १०/०४/२०२२ ते ३०/०६/२०२२ पर्यंत प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येत असून प्रवाशांच्या सोयीनुसार नंतर या रेल्वे विषयी निंर्णय घेण्यात येईल अशी माहिती रेल्वेने प्रसिध्दी पत्रकात दिली आहे. या बाबतीत सदर माहिती श्री अजय दुबे, सदस्य रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती, मध्य रेल्वे मुंबई यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068



टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या