Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूरात हत्येचा थरार ! पतीने पत्नीला पैसे मागितले मात्र पत्नीने दिला पतीस मृत्यू

बल्लारपूरात हत्येचा थरार ! पतीने पत्नीला पैसे मागितले मात्र पत्नीने दिला पतीस मृत्यू 

बल्लारपूर :- घराला घरपण देणारी स्त्री असते जी एक एक पैसा गोळा करून आकस्मिक स्थितीत आपल्या घराला सावरण्यासाठी मदत करीत असते याच हेतून पत्नीने घर कामासाठी बचत गटाच्या माध्यमातून १० हजार रुपयांचे कर्ज घेतले याची माहिती मिळताच पतीने आपला शौक भागविण्यासाठी व पैसे मिळविण्यासाठी पत्नीकडे सारखा तगादा लावला मात्र ३० मार्च ला पहाटेच्या सुमारास हा वाद हाणामारीत रूपांतर झाला यामध्ये पत्नी व इतर नातलगानी मंजूर खान बशीर खान पठाण वय-४८ वर्ष रा.साईबाबा वार्ड बल्लारपूर याला मारहाण केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला व नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात काल बुधवारला रात्री ८:०० वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणात ४ आरोपीना हत्येच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. 

         याविषयीच्या अधिक माहितीनुसार पत्नी रुकसाना मंजूर पठाण वय-३८ वर्ष, रा.साईबाबा वार्ड यांनी काही आवश्यक कार्यासाठी बचत गटांतुन १० हजार रु चे कर्ज घेतले मात्र सदर कर्ज घेतल्याची माहिती पती मंजूर खान ला मिळताच त्याने सदर रक्कम मिळण्यासाठी आपल्या पत्नीशी वाद घातला प्रकरण हातापाई पर्यंत पोहोचले परत दुसऱ्या दिवशी ही पहाटे ५ वाजता सुध्दा पैशासाठी पत्नीशी वाद घालून हाणामारी सुध्दा झाल्याची सूत्राची माहिती आहे. यात रुकसना मंजूर खान पठाण, वय-३८, रा.साईबाबा वार्ड, रेहाना झाकीर हुसेन(रुकसानाची बहीण) वय-४० वर्ष, जुबेर झाकीर हुसेन वय-२२ वर्ष, दोघेही रा.शिवाजी वार्ड बल्लारपूर, मोहम्मद समीर मोहम्मद ताहीर(रेहानाचा जावई), वय-२२ वर्ष, रा.कोडणापूर, ता. खामगाव जि. बुलढाणा असे ४ आरोपी असून यांनी मंजूर खान ला लाठ्या, काठ्याने बेदम मारहाण केली असल्याची घटना असून त्यांचेवर नागपुरात उपचार सुरू असतांना बुधवारला रात्री ८:०० वाजताच्या दरम्यान उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणात ४ ही आरोपीना अटक करण्यात आली असून पुढील तपास उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेंद्र ठाकरे करीत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या