"पल्याड या चित्रपटात बल्लारपूर चा रूचीत..... हलबा समाजाने केला सत्कार .....!

Vidyanshnewslive
By -
0

"पल्याड  या चित्रपटात बल्लारपूर चा रूचीत..... हलबा समाजाने केला सत्कार .....!

बल्लारपूर : - काही महिन्यातच प्रेक्षकांसमोर येणाऱ्या शैलेश भिमराव दुपारे दिग्दर्शित पल्याड या मराठी चित्रपटात बल्लारपूर चा रूचीत निनावे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या १३ वर्षीय बाल कलाकाराचा अनंत धकाते यांच्या निवासस्थानी हलबा समाजातर्फे पुष्पगुच्छ ,गौरवचिन्ह, आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंता धक्काते होते तर प्रमुख अतिथी म्हणून रविंद्र कारगावकर यांची उपस्थिती होती. मागील दोन वर्षांपूर्वी या चित्रपटाच्या कलाकारांसाठी चंद्रपूर येथे निवड समिती आली होती. सुमारे दीडशे बालकलाकार यांमधून १३ वर्षीय रुचित विलास निनावे या बालकलाकाराची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली. एवढ्या कमी वयात मोठ्या पडद्यावर झळकणाऱ्या या बालकलाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे . या बालकलाकाराचे वडील रेल्वे विभागात कर्मचारी असून आई पॅथॉलॉजी लॅब येथे कार्यरत आहे. याप्रसंगी हलवा समाजातील अनेक महिला पुरुष उपस्थित होते. अध्यक्षस्थानी असलेले अनंता धक्का ते म्हणाले," आदिम समाजातील आणि घरात कोणतेही अभिनयाचे धडे न घेतलेल्या कुटुंबातील या बाल कलाकारांनी एवढी झेप घ्यावी हे कौतुकास्पद आहे". प्रमुख अतिथी कारगावकर म्हणाले "तंत्र युगाची व्याप्ती मोठी झाली .सोशल मीडिया घराघरात पोहोचला. नवीन पिढीने या तंत्र युगाचा योग्य वापर केला आणि मनामध्ये जिद्द बाळगली तर आयुष्याचे सोने करण्याची संधी आहे. विविध माहिती या तंत्रयुगाच्या माध्यमातून आपल्याला मिळते .पालक वर्गानेही स्वतःच्या पाल्याची आवड लक्षात घेऊन मुलांना घडवावे." सूत्रसंचालन प्राध्यापक योगेश टेकाडे यांनी केले .तर आभार दमयंती बावणे यांनी मानले

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)