राखी सावंतवर अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करा, बिरसा फायटर्सची मागणी अंगप्रदर्शनाच्या अश्लील विडीओद्वारे आदिवासी समाजाची केली बदनामी, दापोलीच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन

Vidyanshnewslive
By -
0

राखी सावंतवर अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करा, बिरसा फायटर्सची मागणी

अंगप्रदर्शनाच्या अश्लील विडीओद्वारे आदिवासी समाजाची केली बदनामी, दापोलीच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन

वृत्तसेवा :- अंगप्रदर्शनाच्या अश्लील विडीओ द्वारे आदिवासी समाजाची बदनामी करणा-या व समाजात तेढ निर्माण करणा-या अभिनेत्री राखी सावंत यांच्यावर सायबर क्राईम व अॅस्ट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दापोलीचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.बिरसा फायटर्स तर्फे दापोली पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

           निवेदनात म्हटले आहे की,अभिनेत्री राखी सावंत यांनी आदिवासी समाजाला उद्देशून  अश्लील अंगप्रदर्शन कृती करत अश्लील विडीओ बनवून 'विराल भयानी' या नावाच्या आयडीवर इंन्स्टाग्राम व वाटसप अशा सोशल मिडीयावर टाकत संपूर्ण आदिवासी समाजाची बदनामी केली आहे व आदिवासी समाजामध्ये जाणीवपूर्वक तेढ,संताप निर्माण होईल यासाठी आक्षेपार्ह वाईट कृती केली आहे.राखी सावंतच्या ह्या वाईट कृत्याचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो. राखी सावंत यांनी "मेरा ये लूक देख रहे है आज,पुरा ट्रायबल लूक, आदिवासी इसको कहते है हम वो लुक्स है और ये देखिये भूम भूम टरारा भूम भूम!"असे अश्लील शब्दांत अश्लील शारीरीक कृतीद्वारे आदिवासी समाजाला बदनाम केले आहे. आदिवासी समाज शांत व प्रामाणिक आहे.या शांत समाजाला आपल्या अश्लील विडीओद्वारे जाणीवपूर्वक भडकावण्याचे काम राखी सावंत यांनी केले आहे. स्त्रीयांची लाज, लज्जा, मर्यादा तोडून अश्लील कृतीद्वारे स्त्री जातीला सुद्धा कलंकित केले आहे.राखी सावंत यांच्या या सोशल मिडीयावरील अश्लील विडीओ मुळे आदिवासी समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत व राखी सावंतबद्दल आदिवासी समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. राखी सावंतच्या विरोधात देशभर  आदिवासी संघटनांमार्फत निषेध नोंदवला जात असून फौजदारी कारवाईसाठी मागणी केली जात आहे.तरी अंगप्रदर्शनाच्या अश्लील कृतीतून जाणीवपूर्वक आदिवासी समाजाची बदनामी करणा-या, आदिवासी समाजात तेढ व संताप निर्माण करणा-या राखी सावंत यांच्यावर सायबर क्राईम व अॅस्ट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी.हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी,असा आंदोलनाचा इशाराही बिरसा फायटर्स संघटनेने दिला आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)