बल्लारपूर शहरातील युवक राजुरा येथील वर्धा नदीवरील पुलावरून दुचाकी सह नदीत पडला

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर शहरातील युवक राजुरा येथील वर्धा नदीवरील पुलावरून दुचाकी सह नदीत पडला 

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील डॉ.आंबेडकर वॉर्डातील रामेश्वर कालीचरण निषाद हा युवक आपला मित्र  सूरज सोनारकर यांचे सोबत १० मार्च च्या रात्री ११ वाजताच्या दरम्यान राजुरा येथील ढाब्यावरून जेवण करून परत येत असतांना वर्धा नदीच्या पुलावरून वाहनांच्या लक्खं प्रकाशामुळे आपल्या दुचाकी वाहनसह वर्धा नदीत कोसळला याविषयीच्या अधिक वृत्त नुसार हे दोन्ही मित्र राजुरा येथील धाब्यावरन जेवण झाल्यावर रात्री ११:०० वाजताच्या सुमारास परत येत असतांना विरुध्द दिशेने येणाऱ्या वाहनाचा प्रकाश रामेश्वर निषाद यांच्या डोळ्यावर पडला त्यामुळं त्यांचं दुचाकी वरील नियंत्रण सुटले व भरधाव असणारी दुचाकी रामेश्वर सह वर्धा नदीत कोसळली यावेळी सूरज सोनारकर हा पुलावरच कोसळला या घटनेची माहिती लगेच पोलिसांना कळविली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते दुसऱ्या दिवशी पोलिसांनी रामेश्वरचा शोध घेतला असता त्याची दुचाकी पोलिसांना आढळून आली मात्र रामेश्वरचा अजूनही पत्ता लागलेला नाही महत्वाची बाब म्हणजे राजुरा जातांना वर्धा नदीवरील पुलावर मागील अनेक वर्षांपासून लोखंडी रेलिंग नसल्यामुळं अनेक लहान मोठे अपघात घडले आहे त्यानंतरही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करतो की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)