पंजाब मध्ये आम आदमी पार्टीच्या बहुमताने सत्ता प्राप्त केल्याच्या समर्थनार्थ बल्लारपूर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विजयोत्सव : महापुरुषांच्या स्मारकाना अभिवादन करून केला आनंदोत्सव साजरा
बल्लारपूर :- पंजाब राज्यात आम आदमी पार्टीने प्रचंड बहुमताने सत्ता मिळवली आणि आम आदमी पार्टी राष्ट्रीय पक्ष बनला, या निमित्त बल्लारपुर शहरात आम आदमी पार्टीच्या क्रांतिकारी कार्यकर्त्यांनी शहरातील नगरपरिषद चौक आणि वस्ती गांधी चौक पर्यत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून विजयी जल्लोष साजरा केला, प्रारंभी बल्लारपूर शहरात नगर परिषद चौकात असलेल्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले व मिरवणूक काढण्यात आली मागील सुमारे १० वर्षात आम आदमी पार्टी ने प्रगतीचा आलेख मांडला आहे, दिल्लीत दोनदा बहुमत सिद्ध करून सत्ता स्थापन केली. देशाला हेवा वाटेल असा विकास साधला. म्हणूनच आप हेच देशाचे भविष्य आहे, हे पंजाबने स्वीकारले आहे. हा निकाल भविष्याची नांदी आहे, अशी प्रतिक्रिया आप चे शहराध्यक्ष रविकुमार शं. पुप्पलवार यांनी दिली पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसला. आम आदमी पक्षानं सुरुवातीच्या काळामध्ये जोरदार मुसंडी मारली आहे, ११७ मतदारसंघ असलेल्या पंजाबमध्ये आप ९२ जागांवर पुढे आहे. विशेष म्हणजे आपच्या मुसंडीमुळे काँग्रेसची वाताहत होताना दिसत आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते सध्या पिछाडीवर आहेत, हे दिल्ली विकासाचे गमक आहे, असे महिला सचिव ज्योतिताई बाबरे यावेळी म्हणाल्या, देशात भाजपा प्रणित केंद्र सरकारने भ्रष्ट राजकारण केले, विकास कुठेही साधलेला नाही. देशाची सूत्रे आम आदमी पार्टीच्या हातात द्या, असेही जिल्हा विधि सलाहगार ऍड. किशोर पुसलवार म्हणाले, विजयी मिरवणूक रॅलीत बल्लारपुर शहरातील आम आदमी पार्टीच्या क्रांतिकारी महिला तसेच पुरूष कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. एकूणच पंजाब मधील विजयामुळे बल्लारपूर येथील आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांत जोश निर्माण झाला असून येत्या कालावधीत बल्लारपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत जनसेवेच्या माध्यमातून यश संपादन करण्याचा प्रयत्न केला जाईल.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या