तहानलेली बकरी पाणी प्यायला गेली मात्र गुंडात आपण तोंड फसवून बसली अथक प्रयत्नातून मुक्त झाली
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील महात्मा फुले चौक परिसरातील सुनिल रामटेके यांची पाळीव बकरी तहानेने व्याकुळ होऊन पाण्याच्या शोधात भटकत असतांना तिला एक पाण्याचा गुंड(भांडे) दिसले त्या पाण्याने तहान तर भागलीच मात्र झालं उलट त्या गुंडात बकरीच तोंड फसले बकरीच तोंड फसल्याने तिला समोरच काही दिसेनासे झाल्यानं ती सैरावैरा पळू लागली अशातच ती एका बंद नालीत पडली मात्र नागरिकांच्या समयसुचकतेने त्या निष्पाप जीवाचा जीव वाचला बकरी ही नालीत पडल्या वर काही नागरिकांचं लक्ष गेलं आणि त्या मुक्या जनावराला वाचविण्याची धडपड सुरू झाली दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर एकाने मोठा बांबू आणला व एका बाजूने धक्का देत दुसऱ्या बाजूने बकरी आली असता नालीत उतरून तिला बाहेर काढले परंतु तोंडात अजूनही गुंड फसलेलाच होता मोठ्या शिताफीने बकरी मालकाने अथक प्रयत्नातून बकरीच्या तोंडातून गुंड काढला व शेवटी सर्व नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या