हिंगणघाट तालुक्यातील हिवरा घाटावर वर्धा नदीवर पोहायला गेलेल्या २ युवकाचा बुडून मृत्यू

Vidyanshnewslive
By -
0

हिंगणघाट तालुक्यातील हिवरा घाटावर वर्धा नदीवर पोहायला गेलेल्या २ युवकाचा बुडून मृत्यू

वर्धा :- जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात आजनसरा हिवरा नदीवर पोहोण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलासह 2 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणघाट तालुक्यातील हिवरा इथं ही घटना घडली आहे. या घटनेत ऋतिक नरेश पोखळे ( २१ वर्ष ), संघर्ष चंदुजी लढे (१८ वर्ष ) यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर रणजित रामजी धाबर्डे (२८ वर्ष), शुभम सुधाकर लढे (२६ ) या दोघांना नागरिकांनी पाण्याबाहेर काढून प्राण वाचवले. आज दुपारच्या सुमारास दुचाकीने आजनसरा येथून पिपरी येथील रुतीक नरेश पोकळे, संघर्ष चंदुजी लढे, रणजित रामजी धाबर्डे आणि शुभम सुधाकर लढे हे हिवरा येथील वर्धा नदीत पोहायला गेले होते. मात्र, या चौघांना नदीतील पाण्याचा अंदाज आला नसल्याने चार युवक नदीत बुडाले. घटनेची माहिती मिळताच हिवरा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वडनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बागडे, पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य, आशिष डफ, अमोल खाडे, तुषार इंगळे, गुणवता चिडाम यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने रंणजित रामजी धाबर्डे आणि शुभम सुधाकर लढे यांना पाण्याबाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले तर रुतीक नरेश पोखळे आणि संघर्ष चंदुजी लढे यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनांमुळे परीसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)