अबब ! केवळ नाणे स्वरूपात २ लाख ६० हजार रु देऊन खरेदी केली दुचाकी शोरूमच्या ५ कर्मचाऱ्यासह खरेदीदार व त्याचे ४ मित्राना नाणी मोजायला लागले १० तास, विशेष म्हणजे २९ वर्षांपासून नाणेस्वरूपात पैसे साठविल्याची माहिती

Vidyanshnewslive
By -
0

अबब ! केवळ नाणे स्वरूपात २ लाख ६० हजार रु देऊन खरेदी केली दुचाकी

शोरूमच्या ५ कर्मचाऱ्यासह, खरेदीदार व त्याचे ४ मित्राना नाणी मोजायला लागले १० तास, विशेष म्हणजे २९ वर्षांपासून नाणेस्वरूपात पैसे साठविल्याची माहिती

वृत्तसेवा :- या जगात व्यक्ती कधी काय करेल याचा विश्वास नाही एका व्यक्तीने चक्क २९ वर्षांपासून १ रुपयांचे नाणे जमा करणे सुरू केले व त्याच व्यक्तीने एक रुपयांची नाणी देत बाईक खरेदी केली. नाण्यांच्या रुपयात त्याने दोन लाख साठर हजार रुपये भरले. सदर घटना शनिवार २६ मार्चची आहे सूत्राच्या माहितीनुसार शनिवारी सेलममधील एका शोरूममध्ये हा प्रकार घडला. एका रुपयाची नाणी देत या पठ्ठ्याने त्याची ड्रीम बाईक घेतली. पैसे मोजण्यासाठी शोरुमच्या कर्मचाऱ्यांची मात्र धांदल उडाली. त्यांना १० तास लागले. विशेष म्हणजे ही नाणी व्हॅनमध्ये आणली गेली. अखेर 'ट्रे'मधून कर्मचाऱ्यांनी नाणी मोजायला घेतली.

           व्ही. बूपाठी नावाचा तरुण बजाज डोमिनार ४०० ही बाईक खरेदी करण्यासाठी शो रुममध्ये पोहोचला. त्याला पाहून सगळेच कर्मचारी थक्क झाले. बूपाठीला विचारल्यानंतर, २९ वर्षांपासून बाईक घेण्यासाठी पैसे साठवत असल्याचं त्याने सांगितलं. मंदिरे, हॉटेल्स आणि चहाच्या टपऱ्यांवर मिळालेल्या सगळ्या एक रुपयाच्या नाण्यांचं त्याने जतन केलं. या ठिकाणी तो खिशातील अन्य नोटा बदलून घेत असे. आणि सुट्टे झाल्यानंतर त्याचं जतन करत होता. शोरूमचे व्यवस्थापक महाविक्रांत यांनीही या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं. नाण्यांच्या रुपात सुट्टे पैसे स्वीकारण्यास आम्ही सुरुवातीला नकार दिला. पण बूपाठीला निराश करायचं नसल्यामुळे आम्ही तयारी दर्शवली, असं त्यांनी म्हटलं. १ लाख रुपये नाण्यांच्या स्वरुपात मोजण्यासाठी बँका अतिरिक्त कमिशन आकारतील. पण बुपाठीची हाय-एंड बाईक घेण्याचे स्वप्न लक्षात घेऊन मी अखेर संमती दिली, असं व्यवस्थापकांनी म्हटलं. बूपठी, त्याचे चार मित्र आणि शोरुमचे पाच कर्मचारी यांनी एकत्र ही नाणी मोजली. अखेर शनिवारी रात्री नऊच्या सुमारास बुपाठी यांना त्यांच्या बाईकची डिलीव्हरी मिळाली. शहरातील अम्मापेठ येथील गांधी मैदानात राहणारा हा तरुण हा एका खासगी कंपनीत संगणक ऑपरेटर म्हणून काम करतो. तो एक YouTuber देखील आहे. त्याने गेल्या चार वर्षांत अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तीन वर्षांपूर्वी दुचाकीची किंमत विचारल्यानंतर ती दोन लाख असल्याचं सांगण्यात आलं होतं, असं बुपाठीने सांगितल आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)