विसापूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे आठवडी बाजार भरविण्याची मागणी - प्रितम पाटणकर बल्लारपूर विधानसभा सचिव,युवक काँग्रेस चंद्रपूर
विसापूर ग्रामपंचायतला यासंदर्भात दिले निवेदन.
विसापूर/बल्लारपूर :- दिनांक २८ मार्च २०२२ ला चंद्रपूर जि. पालकमंत्री मा.श्री विजयभाऊ वड्डेटीवर, खासदार चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे मा खासदार श्री. बाळूभाऊ धानोरकर, प्रदेश महासचिव युवक काँग्रेस महाराष्ट्र मा. शिवानीताई वड्डेटीवर, जिल्हा उपाध्यक्ष रमीज भाई शेख युवक काँग्रेस चंद्रपूर यांचा मार्गदर्शनाखाली विसापूर गाव मधील प्रितम पाटणकर बल्लारपूर विधानसभा सचिव युवक काँग्रेस चंद्रपूर यांचा नेतृत्व मध्ये विसापूर ग्रामपंचायत कार्यालय ला गावामधील दैवत. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे आठवडी बाजार भरविण्यास यावे या साठी दिले निवेदन तसेच विसापूर गावचे लोकसंख्या २५००० पेक्षा जास्त असून जर गावा मधील आठवडी बाजार भरला तर नागरिकांना व्यापार करण्यास मदत होणार तसेच विविध प्रकारच्या भाजी पाल्याची दुकान सुद्धा चौक मध्ये लागणार त्यामुळे गावामधील शेतकऱ्यांना त्याचे फायदा होणार आणि गावामधील नागरीक प्रवास करून बाहेर शहरामध्ये जाऊन भाजी-पाला अन्य लहान सहान वस्तू खरेदी करण्यासाठी जातात म्हणून शेतकरी, साधारण सामान्य व्यक्ती, छोटे व्यापारी, यांचा सर्व गोष्टीचे बाब लक्षात घेता तसेच गावामधील कुठेतरी व्यापारी दुकानदारास चालना मिळेल म्हणून निवेदन देण्यात आले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या