ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एक नवीन पाहुणा दाखल ! अडचणीत असलेल्या वन्यजीवाला जवळून बेशुद्ध करता येणार
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला एक उपयोगी वाहन भेट स्वरूपात मिळाले. या वाहनाचा उपयोग करून जंगलाच्या दुर्गम भागात जाता येणार आहे. समस्याग्रस्त वन्यजीवाला जवळून बेशुद्ध करता येण्याची सोय झाली आहे. वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षात हे वाहन विशेष सहाय्यभूत ठरणार आहे. या खास रचना केलेल्या चारचाकी वाहनात बचाव दलाच्या सुरक्षेची (Rescue Security) खास काळजी घेण्यात आली आहे. असे पहिले वाहन ताडोबाच्या सेवेत दाखल दाखल झाले आहे. या वाहनांची उपयोगिता पाहून अन्य व्याघ्र प्रकल्पात अशी वाहने समाविष्ट केली जाणार आहेत. मानव-वन्यजीव संघर्षामुळे अनेक वेळा वाघांना जेरबंद करणे आवश्यक असते. मात्र वाघ पकडण्याची ही मोहीम अनेक वेळा दीर्घकाळ चालते. यामुळे श्रम-पैसा आणि वेळ यांचा खूप अपव्यय होतो. सोबतच वाघ पकडायला वेळ लागल्यास ती वाघ किंवा माणसांच्या जीवावर बेतू शकते. डार्ट मारून बेशुद्ध करण्याची प्रचलित पद्धत वाघ पकडण्यासाठी सध्याची प्रचलित पद्धत म्हणजे वाघाला डार्ट मारून बेशुद्ध करणे. यासाठी पाळीव प्राणी एखाद्या ठिकाणी बांधून वाघ त्या पाळीव प्राण्याची शिकार करेल याची वाट पहावी लागते. मग वाघ ती शिकार खाण्यात गुंग असला की त्याला डार्ट मारला जातो. मात्र वाघ जर आक्रमक झाला किंवा तो जर अडचणींच्या जागेवर असेल तर त्याला डार्ट मारता येत नाही. विशेष वाहन डिझाईन करण्यात आले आहे. मात्र आता या समस्येवर उपाय म्हणून हे विशेष वाहन डिझाईन करण्यात आले आहे. या वाहनांच्या सहाय्याने थेट वाघ जिथे आहे तिथे जाऊन त्याला बेशुद्ध करता येणार आहे. हे वाहन जंगलातल्या कुठल्याही दुर्गम भागात, कुठल्याही ऋतूत काम करू शकणार आहे, प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव) सुनील लिमये यांनी सांगितलं. जंगलाच्या दुर्गम भागात जाऊन समस्याग्रस्त वन्यजीवाला जवळून बेशुद्ध करता येण्याची सोय राहणार आहे. पहिले वाहन ताडोबाच्या सेवेत दाखल झाले आहे. या वाहनांची उपयोगिता पाहून अन्य व्याघ्र प्रकल्पात वाहने समाविष्ट करण्यात येणार आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या