बल्लारशाह रेल्वे(आर.पी.एफ) पोलिसांनी पकडला २ कोटी १० लाख ६७ हजारांचा मुद्देमाल : ४ आरोपीना केली अटक

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारशाह रेल्वे(आर.पी.एफ) पोलिसांनी पकडला २ कोटी १० लाख ६७ हजारांचा मुद्देमाल : ४ आरोपीना केली अटक

बल्लारपूर :- बल्लारशाह रेल्वे पोलिसांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार आज ५ मार्च ला श्री आशुतोष पांडे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत सीसीटीव्ही च्या आधारावर ४ अज्ञात व्यक्तीनी त्रिपुर येथे सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून त्रिपुर ते चेन्नई या १२५७८ या रेल्वे ने चोरीच सोन चांदी व रोख रक्कम घेऊन जात असल्याची माहिती मिळाली या सूचनेचा आधारावर एम.के.मिश्रा पोलीस निरीक्षक रेल्वे पोलीस, नवीन प्रताप सिह, पोलीस निरीक्षक चंद्रपूर यांच्या नेतृत्वात प्रवीण महाजन, प्रवीण गाढवे, डी.के.गौतम, राम लखन, राम वीर सिह, डी.एच.डूबल, जितेंद्र पाटील, पवन कुमार देशराज मीना, रुपेश कुमार मोहम्मद अन्सारी, ललित कुमार, व चमू ने आज सकाळी ९:४७ च्या दरम्यान बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ५ वर आलेल्या १२५७८ या बागमती एक्सप्रेस मध्ये पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर चौकशी केली असता ते ४ ही व्यक्ती रेल्वे च्या विविध डब्ब्यात असल्याचे आढळून आले विशेष म्हणजे या चौघांनी आपली ओळख पटू नये म्हणून प्रयत्न केला या ४ ही व्यक्ती कडून विविध बॅग जप्त करण्यात आल्या तसेच २ पंच व १ सोनाराला पोलीस स्थानकात बोलावून विचारपूस केली असता त्यांनी आपली नाव १) मेहताब आलम - ३७ वर्ष, अररिया बिहार, २) बदरूल जहागीर खान २० वर्ष, ३) मोहम्मद सुभान वय-३० वर्ष, ४) दिलकस मो.आरिफ वय-२० वर्ष, रा.अररिया, बिहार राज्य या सर्वांकडून साहित्य जप्त करण्यात आले यामध्ये ३३०६.७१० ग्राम सोने अंदाजित किंमत १७६५७८३१.४० रुपये, तर २७.९७२ किलो ग्राम चांदी अंदाजित किंमत १९५८०४० रुपये तसेच १४,५२,१०० /- रुपये रोख असा एकूण २ कोटी १० लाख ६७ हजार ९७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व याबद्दल तामिळनाडू पोलिसांशी सम्पर्क करण्यात आला असून त्यांच्या आगमनानंतर पकडलेला मुद्देमाल व आरोपी तामिळनाडू पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती श्री आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)