रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील १२ पैकी १० विद्यार्थी भारतात परतले
६ विद्यार्थी स्वगृही तर ४ विद्यार्थी दिल्लीत असल्याची सूत्राची माहिती
चंद्रपूर :- मिनिटामिनिटाला धुमसत असलेल्या रशिया युक्रेन युद्धामुळे हजारो भारतीयांच्या मनात भीतीचे काहुर उमटत असुन ह्या युद्धात झालेल्या गोळीबारात केरळ येथील एक विद्यार्थी मृत्युमुखी पडल्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला लागले असुन पालकांची दैन्यावस्था बघायला मिळत आहे. भारत सरकार प्रयत्नाची पराकाष्ठा करून युद्धजन्य स्थितीत अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आण्यासाठी उपाययोजना करत असुन आतापर्यंत तीन हजारावर भारतीयांना परत आणण्यात यश आले आहे तर देशातील जवळ्पास 4 केंद्रीय मंत्री युक्रेन शेजारील राष्ट्रांत तळ मांडून बसले आहेत. अशातच चंद्रपूरकरांसाठी आनंदाची बातमी मिळाली असुन युक्रेन येथे अडकलेले 12 पैकी 10 विद्यार्थी सुखरूप मायदेशी पोहचले असुन त्यापैकी 6 विद्यार्थी घरी पोहचले आहेत तर 4 विद्यार्थी दिल्ली येथे पोहचले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 12 विद्यार्थी युक्रेन मधे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत हे विशेष. स्वगृही परतेल्या 10 विद्यार्थ्यांमध्ये
1. अदिती अनंत सायरे, वरोरा 2. हर्षल बळवंत ठावरे, चिमुर 3. ऐश्वर्या प्रफुल्ल खोब्रागडे, चिमुर 4. धीरज अशिम बिश्र्वास ,चंद्रपूर 5. महेश भोयर, चंद्रपूर 6. महक उईके, ब्रम्हपुरी 7. साहिल संतोष भोयर, बल्लारपूर 8. खुशाल बिपुल विश्वास, चंद्रपूर 9. शेख अलीशा करीम, राजुरा 10. गुंजन प्रदिप लोणकर ,चिमुर, ह्याचा समावेश आहे. स्वगृही परतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडुन वाहत असला तरीही आपल्या अडकलेल्या इतर मित्रांची काळजीसुद्धा त्यांना लागली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या