अबब ! अवघ्या ५० रुच्या दारूच्या व्यसनापायी एका व्यक्तीला गमवावा लागला जीव ६० वर्षीय वृद्धाला जिवंत जाळल्याची घटना, ३ संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त

Vidyanshnewslive
By -
0

अबब ! अवघ्या ५० रुच्या दारूच्या व्यसनापायी एका व्यक्तीला गमवावा लागला जीव 

६० वर्षीय वृद्धाला जिवंत जाळल्याची घटना, ३ संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त

वर्धा :- वर्ध्यातील आर्वी तालुक्यात एक मन हादरवणारी घटना समोर आली आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात एका साठ वर्षांच्या वृद्धाला जिवंत जाळण्यात आले. यात या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. आर्वी तालुक्यातील रामपूर इथली ही घटना असून मृत व्यक्तीचे नाव अभिमान असे आहे. अभिमान याला दारु पिण्याचे व्यसन होते. सोमवारी अभिमान दारु घेण्यासाठी गावातील एका दारु विक्रेत्याकडे गेला होता. याठिकाणी काही जणांबरोबर अभिमान यांचा वाद झाला. अवघ्या ५० रुपयांवरुन हा वाद पेटला आणि याचे पर्यावसान मारहाणीत झाले. हा वाद इतका टोकाला गेला की संतापलेल्या आरोपींनी अभिमानला जिंवत जाळले. यातच होरपळून अभिमान यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी आर्वी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)