बल्लारपूर येथील सिध्दार्थ बुध्द विहारात पार पडला बीएस-फोर चा प्रबोधनात्मक कार्यक्रम
बल्लारपूर :- भारतीय संविधान देशातील १००% लोकांसाठी असुन सर्वांचे जन्मापासुन तर अंतीम संस्कारांच्या पर्यंत अधिकार सुरक्षित आहेतच. शासनकर्त्यांनी भारतीय संविधानाला हेतुपुरस्सरपणे बायपास करून आपल्या हिताचे कायदे केले त्यामुळे देशात गरिब अधिक गरिब होत गेले तर श्रीमंतांच्या हातात सत्ता आहे. यामुळे विषमतेचा लोकशाहीला धोका असल्याचे वक्त्यांनी सांगितले. सिध्दार्थ बुध्द विहार, सिध्दार्थ वार्ड,बल्लारपूर येथे दि.२८/३/२२ ला सायं.संपन्न बिएस-फोर (भारतीय संविधान, सन्मान,सुरक्षा,संवंर्धन)च्या अध्यक्षस्थानी मा.कविता मडावी, मा.रा.उपा.बामसेफ होत्या. तर वक्ते मा.एम.टी.साव मा.जि.के.उपरे,माजी मानद सचिव सिडीसिसी बॅंक, मा.संघा साव, मा.वनिता भसारकर, मा.एम.एस. करमनकर,इ.नी विचार व्यक्त केले.प्रास्ताविक मा.दिवाकर मडावी,यांनी केले.या कार्यक्रमाचं संचालन मा.सुलोचना मालखेडे मॅडम यांनी तर आभार मा.एड्.रमन पुणेकर, समता सैनिक दल,यांनी मानले.कार्यक्रम यशश्वीते करिता मा.माया करमनकर, मा.लिला नगराळे, मा.गंगाबाई मालखेडे, मा.उज्वला उमरे, मा.सरिता मून, मा.निता दुर्योधन,मा.शांता मून,मा.प्रतिभा मून,इ.नी प्रयत्न केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या