घुग्गुस हत्याकांड प्रकरणातील २ आरोपीना अटक मात्र सुरक्षेच्या दृष्टीने नाव गुप्त : दोन दिवसांची पोलीस कोठडी

Vidyanshnewslive
By -
0

घुग्गुस हत्याकांड प्रकरणातील २ आरोपीना अटक मात्र सुरक्षेच्या दृष्टीने नाव गुप्त : दोन दिवसांची पोलीस कोठडी

घुग्गुस :- घुग्गुस येथील उपसरपंच यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी असलेले कादर शेख जामिनावर बाहेर आले असतांना १९ फरवरीच्या रात्री १०:३० ते ११:०० च्या दरम्यान अज्ञात आरोपीनी घुग्गुस येथील बँक ऑफ इंडिया च्या परिसर लगत धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर घुग्गुस शहरात वातावरण तणावपूर्ण झाले असतांना जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवीले घुग्गुस पोलिसांनी घटनेच्या ३ दिवसानंतर २ आरोपीना अटक केली आहे याकरिता घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत तसेच अन्य आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक अन्य-अन्य राज्यात पाठविली आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपी विरुध्द ३०२, ४३,४८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुरक्षेच्या दृष्टीने आरोपींचे नाव गुप्त ठेवण्यात आले असून आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या पुढील तपास बबन पुसाटे पोलीस निरीक्षक घुग्गुस यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संजय सिंग करीत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)