अबब ! चक्क नातवाने आजोबाचा खून करून घरातच पुरला मृतदेह : तब्बल ४५ दिवसानंतर घटना उघडकीस आली, सिंदेवाही तालुक्यातील धक्कादायक घटना
सिंदेवाही :- तालुक्यातील लाडबोरी येथे आजोबाला नातवाने कुह्राडी च्या दांड्याने डोक्यावर वार करून हत्या केल्याची घटना काल मंगळवार ला सायंकाळच्या सुमारास उघडीस आली आहे. आजोबाचा मृतदेह घरीच मातीमध्ये पुरला याची तक्रार आरोपी सुरज शेलकर ची आई मंदा शेलकर यांनी सिंदेवाही पोलीसांना तक्रार दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की सिंदेवाही तालुक्यातील जवळच असलेले चार किलोमीटर अंतरावरील लाडबोरी गाव असुन या गावातील मृतक कवडू देठे वय ७५ वर्ष रा. लाडबोरी याची हत्या मागील महीन्याचा ५ जानेवारी २०२२ ला सकाळी दहा वाजता झाल्याची माहिती मिळाली आहे. आजोबांचे मृतदेह घरीच मागील ४५ दिवसांपासून आरोपीने मातीत पुरले होते. आरोपी नाव – सुरज सुधाकर शेलकर वय २५ वर्ष रा. बेंबाळ ता. वरोरा जिल्हा चंद्रपूर असे असुन यांनी स्वत:च्याच आजोबाच्या डोक्यावर कुराडीचा दांड्याने वार करुन हत्या केली त्यानंतर सूरजने आजोबाचा मृतदेह घरीच मातीत ४५ दिवसांपूर्वीच पुरले होते. पैशाच्या व दागिन्याच्या लालसेपोटी नातवाने आजोबाची हत्या करण्यात आली आहे. आजोबाची हत्या करणारा नातू सुरज चे आईने पोलीसात तक्रार केली. त्याआधारे सिंदेवाही पोलीस पंचा समक्ष हत्या केलेल्या ठिकान गाठुन पंचनामा केला. व घटनास्थळा वरून आरोपी सुरज सुधाकर शेलकर याला अटक केली त्यावर पोलिसांनी ३०२, २०१, ४०४ भादंवि नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सिंदेवाही पोलीस ठाणेदार घारे करीत आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या