बारावीच्या विद्यार्थ्यानसाठी महत्वाची बातमी ! संगमनेर जवळ प्रश्नपत्रिकेच्या वाहनाला अपघात झाल्यामुळं परीक्षा समोर ढकलल्याचे वृत्त
मुंबई :- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. बारावीच्या लेखी परीक्षेत अंशतः बदल झाला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलली असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे त्यामुळे पाच आणि सात मार्चला होणारी परीक्षा आता पाच आणि सात एप्रिलला होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, यामध्ये बाकीच्या पेपर नियोजनात कोणताही बदल झालेला नाही. तसेच दहावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, वेळापत्रकात बदल झाला आहे. संगमनेर जवळ चंदनापुरी घाटातील अपघातात प्रश्नपत्रिका नेणारे वाहन आगीत जळुन भस्मसात झाले आहे. यात असणाऱ्या हिंदी आणि मराठीच्या प्रश्नपत्रिका या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षा तोंडावर असताना ही घटना घडली असल्याने बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी बोर्डाने एक बैठक घेत आणि हेच दोन पेपर एक महिना पुढे ढकलण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या बदलेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी असे आवाहन बोर्डाने केले आहे. इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार, 15 मार्च 2022 तर इयत्ता बारावीची परीक्षा शुक्रवार 4 मार्च 2022 पासून सुरू होणार आहे. यासाठी मंडळाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक जारी करण्यात आले असून तेच वेळापत्रक विद्यार्थी, शाळा, पालक यांनी प्रमाण मानावे, आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही वेळापत्रक आणि माहितीवर विश्वास ठेवू असे आवाहन मंडळाने केले आहे. दहावी बारावीच्या. परीक्षा आणि त्याचे सविस्तर वेळापत्रक हे राज्य शिक्षण मंडळाच्या https://www.mahasscboard.in यावर संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले असून परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या