बल्लारशाह येथील पिटलाईनचे काम ३१ मार्च पर्यंत पूर्णत्वाकडे.... माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची पितलाईनच्या कामाला भेट

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारशाह येथील पिटलाईनचे काम ३१ मार्च पर्यंत पूर्णत्वाकडे.... माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची पितलाईनच्या कामाला भेट 


बल्लारपूर :- बल्लारपूर येथील सुरु असलेल्या पिटलाईन (थर्ड लाईन) च्या कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता मार्च महिन्या अखेर पिटलाईन चे काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले. या लाइनमुळे यापुढे बल्लारशाह, चंद्रपूर मार्गे थेट मुंबई, दिल्ली, कोलकत्ता व अन्य मेट्रो शहरांकडे रेल्वे गाड्या सुरु होणार. तसेच या पिटलाईनमुळे बल्लारशाह-नागपूर मेट्रोही सुरू होण्याची शक्यता आहे यामुळं बल्लारशा रेल्वे स्थानकाचे वैभव वाढेल, हे फार महत्वाचे व महत्वाकांक्षी काम पूर्णत्वाकडे येत असल्याने आनंद व्यक्त केला. यावेळी माजी गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांच्या सोबत भाजपा नेते चंदनसिंग चंदेल, समीर केने, देवा वाटकर,  चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीचे दामोदर मंत्री, श्रीकांत राजूरकर, विकास राजूरकर, श्याम सारडा, अनीश दिक्सित, प्रदीप माहेश्वरी, प्रहलाद शर्मा, प्रमोद त्रिवेदी, श्रीनिवास सुंचूवार, रामेश्वर पासवान, पूनम तिवारी, गौतम यादव तसेच रेल्वेचे स्थानक प्रमुख  एम.यु.खान साहेब, रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख मिश्राजी तसेच रेल्वेचे अधिकारी व अभियंता आदींची उपस्थिती होती. यावेळी रेल्वे चे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून त्यांनी पिटलाईनचे काम युध्दपातळीवर सुरू असून ३१ मार्च पर्यंत पूर्णत्वास येईल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यानी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना दिली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)