येणाऱ्या भीमजयंतीच्या पर्वावर श्री रविराज लिखित " आम्ही भिमाची लेकरं " मराठी डीजे गीत रसिकांच्या भेटीला

Vidyanshnewslive
By -
0

येणाऱ्या भीमजयंतीच्या पर्वावर श्री रविराज लिखित " आम्ही भिमाची लेकरं " मराठी डीजे गीत रसिकांच्या भेटीला 

बल्लारपूर :- येण्याऱ्या १४ एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त बल्लारपूर येथील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. रवी  यांनी श्री रविराज लिखित मराठी DJ गीत " आम्ही भिमाची लेकरं " लवकरच आपल्याला थिरकावण्यास येत आहे ज्याची निर्मिती बल्लारपूर येथील स्वराज्या फिल्म प्रॉडक्शन चे श्री. मंगेश रेगुंडावर करणार असून या गीताला संगीत दिल आहे श्री. निखिल गटलेवार. DJ च्या तालावर श्री. रविराज आपल्याला सांगू इच्छितात कि आम्ही सगळी भीमाची लेकर आहोत आणि त्यांची पुण्याई आपण कधीच विसरू शकणार नाही निर्मात्यांनी आव्हाहन केल आहे कि या गीता ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचायला पाहिजे आणि आपल्या स्थानिक कलाकारांना वाव मिळाला पाहिजे. जेणेकरून स्थानिक पातळीवरील कलावंताना अशा कार्यक्रमात  आपलं कौशल्य दाखविण्याची संधी मिळू शकेल.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)