भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)आतापर्यंतच्या सर्वात जड अशा कम्युनिकेशन सॅटेलाइटचे म्हणजेच CMS-03 किंवा GSAT-7R, प्रक्षेपण (Indian Space Research Organisation (ISRO) has launched the heaviest communication satellite ever, CMS-03 or GSAT-7R.)
वृत्तसेवा :- इस्रोला शुभेच्छा देऊ या ! आता काही तासा पूर्वी म्हणजे संध्याकाळी ५ वाजून २६ मिनिटांनी, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)आतापर्यंतच्या सर्वात जड अशा कम्युनिकेशन सॅटेलाइटचे म्हणजेच CMS-03 किंवा GSAT-7R, प्रक्षेपण केले आहे. हा उपग्रह लॉन्च व्हेईकल मार्क-III (LVM-3) या रॉकेटच्या माध्यमातून अवकाशात झेपावेल. ही मोहीम भारताच्या अंतराळ कार्यक्रमातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून, देशाच्या उपग्रह तंत्रज्ञानातील आणि प्रक्षेपण क्षमतेच्या प्रगतीचे दर्शन घडवणार आहे. GSAT-7R, ज्याला CMS-03 (कम्युनिकेशन सॅटेलाइट-03) असेही म्हटले जाते, हा भारतीय नौदलासाठी इस्रोने विकसित केलेला अत्याधुनिक मल्टी - बँड लष्करी कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे. हा उपग्रह जुन्या GSAT-7 (रुक्मिणी) उपग्रहाचा थेट पर्याय म्हणून कार्य करणार आहे. यामुळे नौदलाच्या नेटवर्कवर आधारीत युद्धक्षमता अधिक सक्षम होणार आहे. GSAT-7R उपग्रह युद्धनौका, पाणबुड्या, विमानं आणि तटवर्ती नियंत्रण केंद्रे यांच्यामधील आवाज, व्हिडिओ आणि डेटा कम्युनिकेशन सुलबह करणार आहे, ज्यामुळे भारतीय नौदलाची कार्यक्षमता आणि समन्वय मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हे रॉकेट रविवारी सायं. ५:२६ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथून उड्डाण घेईल. या प्रक्षेपणासाठीची काउंटडाउन प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली आहे. इस्रोला शुभेच्छा देऊ या !
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या