बल्लारपूर नगराध्यक्ष पद भाजप साठी सोप ठरणार, काँग्रेस एकवटणार, की वंचित बहुजन आघाडी निकालाची दिशा फिरविणार? (Will the Ballarpur Mayor post be easy for the BJP, will the Congress unite, or will the Vanchit Bahujan Aghadi turn the tide of the election?)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर नगराध्यक्ष पद भाजप साठी सोप ठरणार, काँग्रेस एकवटणार, की वंचित बहुजन आघाडी निकालाची दिशा फिरविणार? (Will the Ballarpur Mayor post be easy for the BJP, will the Congress unite, or will the Vanchit Bahujan Aghadi turn the tide of the election?)


बल्लारपूर :- शहरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे जोमात वाहू लागले आहेत. त्यातच महिला ओबीसी म्हणून बल्लारपूरचे नगराध्यक्ष हे पद राखीव झाले आहे. नगराध्यक्ष पदाकरिता अनेक दिग्गज आपल्या तयारीला लागले असले तरी खरी लढत काँग्रेसच्या अलका वाढई, भाजपचा शुभांगी शर्मा, वंचित चा संभावित उमेदवार वंदना तामगाडगे यांच्या मध्येच राहील. भाजपाकडून रेणुका दुधे या जुने जाणत्या पक्षाच्या नेत्या उत्सुक आहे. तसेच भाजपा कडून काही हवसे गवसे यांनीही तिकीट मागितली असली तरी माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या पत्नी शुभांगी यांचा राजकीय, सामाजिक, व आर्थिक पाठबळ असल्याने त्या डॉक्टर अनिल वाढई यांच्या पत्नीस नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत टक्कर देऊ शकतात जिंकण्याची संधी भाजपाला मिळू शकते. जिल्ह्याचे वरिष्ठ नेते चंदनसिंह चंदेल हे आपल्या अनुभवावरून शुभांगी शर्मालाच तिकीट देतील असा कयास राजकीय क्षेत्रात व्यक्त केल्या जात आहे. त्याच प्रमाणे काँग्रेसच्या वतीने संभावित उमेदवार म्हणून अलका वाढई यांच नाव सुरु असून डॉक्टर अनिल वाढई हे मागील पंधरा वर्षापासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत तर अलका वाढई या चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील तेरा वर्षापासून संचालिका आहेत. त्यांनी समाजाची सेवा करण्याचा जणू काही वसा उचलला आहे. बल्लारपूर शहरातील त्यांचे कार्य, शहरात असलेलं सामाजिक कार्य शहरवासी विसरू शकत नाही. अजात शत्रू म्हणूनही त्यांची ख्याती आहे. डॉक्टर साहेबांची सर्वसामान्य अशी जोडलेली नाळ व त्यांच्या शांत व संयमी स्वभावामुळे ते नगराध्यक्षाची निवडणूक सहजपणे जिंकू शकत असल्याची चर्चा सद्या तरी शहरभर आहे. तर दुसरीकडे हरिश शर्मा यांचा मागील पाच वर्षाचा नगराध्यक्षाचा कार्यकाळ वाखण्याजोगा होता. शांत संयमी व सहनशीलतेच प्रतीक म्हणून त्यांना ओळखले जाते.। त्यांच्या मागे असलेल्या कार्यकत्यांची फौज, शहरातील प्रत्येक नागरिकाशी असलेला दांडगा संपर्क व वरिष्ठ नेते चंदनसिंह चंदेल यांचा आशीर्वाद ही हरीश शर्मा साठी जमेची बाब आहे. दुसरा तरी कोणताही उमेदवार अलका वाढई यांना टक्कर देताना सध्या तरी दिसत नाही. मात्र यात वंचित बहुजन आघाडीच्या वंदना तामगाडगे ह्या दोघांचेही गणित बिघडवू शकतात. त्याचं कारण म्हणजे याच्या मागे असलेला आंबेडकरी समाज व समाजाची असलेली 26 टक्के मतदार संख्या आहे. त्याचा मागे असलेले समाजिक कार्यकर्ते ज्याची समाजापूर्ती नाहीतर दुसऱ्या वर्गात ही चांगला दबदबा आहे. त्यातच राजू झोडे, पवन भगत, व अनेक सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते यांचं पाठबळ निश्चितच वंदना यांना तारू शकते. यामुळे वंदना तामगाडगे याही जबरदस्त शर्यतीत आहे म्हणणे वावगे ठरणार नाही. वंदना तामगाडगे यांनी जर ओबीसी समाज जोडण्यात यश संपादन केलं तर बल्लारपूर नगराध्यक्षाचा निकाल आश्चर्य जनक लागल्यास काही नवल वाटणार नाही. काहीही असो अलका वाढई, शुभांगी शर्मा, वंदना तामगाडगे ह्या जर उभ्या राहिल्या तरच तीन पैकी एक नगराध्यक्ष म्हणून निश्चित येतील अन्यथा काँग्रेस आणि वंचित हेच शर्यतीत राहतील. सध्यातरी भाजपला तारणारा उमेदवार म्हणजे शुभांगी हरीश शर्मा एवढे मात्र सत्य...! 

संकलन/मार्गदर्शन :- राहुल गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार, बल्लारपूर

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)