चंद्रपूर शहरातील बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय या रस्त्याला निधीची मिळाली मंजुरी (Funding approval has been received for the road from Bagla Chowk to Rajiv Gandhi Engineering College in Chandrapur city.)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूर शहरातील बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय या रस्त्याला निधीची मिळाली मंजुरी (Funding approval has been received for the road from Bagla Chowk to Rajiv Gandhi Engineering College in Chandrapur city.)

चंद्रपूर :- अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय या रस्त्याला निधीची मिळाली मंजुरी चंद्रपूर शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला बागलाचौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय या रस्त्याच्या विकासासाठी अखेर शासनाकडून ₹5.90 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाला आता गती मिळणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. या रस्त्याच्या दुरुस्ती आणि विकासाबाबत जनतेकडून सातत्याने मागणी होत होती. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला सोय व्हावी, तसेच परिसराचा विकास व्हावा या उद्देशाने सतत पाठपुरावा करत आलो आहे. अखेर शासनाने या कामाला मंजुरी देत निधी मंजूर केला आहे. हा निधी मंजूर होणे म्हणजे जनतेच्या विश्वासाला दिलेले पायाभूत बळच आहे. आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाल्याचा आनंद असून, लवकरच या रस्त्याचे काम हाती घेऊन तो जनतेसाठी खुला करण्यात येईल. यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाचा लाभ मिळेल.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)