चंद्रपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज र्ऑनलाईनरित्या सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील 11 वी, 12 वी व त्यानंतरचे व्यावसाईक तसेच बिगर व्यावसाईक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेले, सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेले व शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेनंतर वस्तीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना https//hmas.mahait.org या पोर्टल वर ऑनलाईन सुरू करण्यात आलेली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 26 डिसेंबर 2024 च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची व्याप्ती तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था, ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील तसेच तालुक्यातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा, ही अट विभागाच्या रद्द करून याऐवजी अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा, अशी सुधारणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील स्वाधार योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांनी https//hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर या कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन सहायक विनोद मोहतुरे यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या