विभागीय स्तरावरील महिला लोकशाही दिन १३ ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे आयोजन (Divisional Level Women's Democracy Day organized on 13th October at Divisional Commissioner's Office, Nagpur)

Vidyanshnewslive
By -
0
विभागीय स्तरावरील महिला लोकशाही दिन १३ ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे आयोजन (Divisional Level Women's Democracy Day organized on 13th October at Divisional Commissioner's Office, Nagpur)

चंद्रपूर :- राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधीचा मूलभूत अधिकार प्रदान केला आहे. या तत्वानुसार महिलांना त्यांच्या समस्या व तक्रारी मांडण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनामार्फत “महिला लोकशाही दिन” ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून समाजातील समस्याग्रस्त व पीडित महिलांना न्याय मिळविण्यासाठी शासकीय यंत्रणेशी थेट संवाद साधण्याची व त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्याची संधी मिळते. या उपक्रमांतर्गत विभागीय स्तरावरील महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त (महसूल) कार्यालय, नागपूर विभाग, नागपूर येथे आयोजित केला जातो. त्या अनुषंगाने विभागीय महिला लोकशाही दिन दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी महिलांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी खालील निकष ठरविण्यात आले आहेत अर्ज विहित नमुन्यात असावा. तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे व दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी झालेल्या जिल्हा स्तरावरील महिला लोकशाही दिन समितीच्या कार्यवाही अहवालाची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
           खालील प्रकारच्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत न्यायप्रविष्ट प्रकरणे. विहित नमुन्यात नसलेले अथवा आवश्यक कागदपत्रांशिवाय आलेले अर्ज. सेवा विषयक वा आस्थापना विषयक बाबी. वैयक्तिक स्वरूपाचे नसलेले तक्रार निवेदन. “महिला लोकशाही दिन” हा महिलांना त्यांच्या हक्कांसाठी न्याय मिळविण्याचा आणि शासनाशी थेट संवाद साधण्याचा प्रभावी मंच ठरत असून, अधिकाधिक महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास विभाग, नागपूर यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)