13 ऑक्टोंबर 1935 नाशिकच्या येवले मुक्कामी बाबासाहेबांची धर्मातराची घोषणा (13 October 1935 Babasaheb's announcement of conversion at Yeola Mukkami in Nashik)

Vidyanshnewslive
By -
0
13 ऑक्टोंबर 1935 नाशिकच्या येवले मुक्कामी बाबासाहेबांची धर्मातराची घोषणा (13 October 1935 Babasaheb's announcement of conversion at Yeola Mukkami in Nashik)

वृत्तसेवा :- 13 ऑक्टोंबर 1935 रोजी येवले मुकामी धर्मांतराविषयी अस्पृश्य समाजाचे मनोगत जाणून घेण्यासाठी सभा भरविली व याच सभेत ”मुक्ती कोण पथे” हे बाबासाहेबांचे ऐतिहासिक भाषण झाले. या भाषणामध्ये बाबासाहेबांनी बुद्धांचाच उपदेश जनतेला दिला. त्यानंतर १७ मे १९४१ साली डॉ. बाबासाहेबांनी जनता वृत्तपत्रात ‘ बुद्धजयंती आणि तिचे राजकीय महत्व ‘ हा अग्रलेख लिहिला . आणि सर्वांनी बुद्ध जयंती साजरी करावी असे आवाहन त्यांनी त्या लेखातून केले. त्यांनी बुद्धांचे चरित्र आणि भगवान बुद्धांचे कार्य याविषयी विस्ताराने प्रकाश टाकला . २० जुलै १९४६ रोजी बाबासाहेबांनी मुंबई येथे ” सिद्धार्थ कॉलेज ” सुरु केले या महाविद्यालयाचे नाव बुद्धांच्या नावावरून त्यांनी ठेवले १९ जानेवारी १९४९ रोजी एका सभेत बाबासाहेबांनी ” क्रांतीचे चक्र आपण फिरवू या ” या आशयाचे भाषण दिले. २ जानेवारी १९५० रोजी नवी दिल्ली येथे बुद्धजयंती निमित्त भाषणात ते म्हणाले ” भगवान बुद्धांमुळेच भारताची शान आहे व बौद्ध धम्मामुळेच भारत देश महान असल्याचे त्यांनी सांगितले १९ व २२ मे १९५० रोजी हैद्राबाद येथील पत्रकार परिषदेत बोलतांना बाबासाहेब म्हणाले ” मीच काय , भारत देश बुद्धधम्मीय व्हावे व संपूर्ण भारताने बौद्ध धम्म स्वीकारावा . “
           ४ डिसेंबर १९५४ रोजी रंगून येथे जागतिक बौद्ध परिषदेत डॉ. बाबासाहेब म्हणाले, इतक्या देशात बौद्ध धम्म असूनसुद्धा त्याचा प्रचार व प्रसार होत नाही .व त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार करण्याविषयी दृढ संकल्प केला २३ सप्टेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याचा दिवस व ठिकाण निश्चित केले. व १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे मी धर्मांतर करणार असा संदेश त्यांनी जनतेस दिला व ठरल्याप्रमाणे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर नागभुमीत भव्यमंडपात सकाळी ९.३० च्या सुमारास बाबासाहेब व माईसाहेब आंबेडकर यांचा बौद्ध धम्म दीक्षा विधी पूज्य भन्ते चंद्रमणी महास्थवीर यांनी केल्यानंतर पुनः त्याच मंडपात खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुमारे पाच (५) लाखापेक्षा अधिक बांधवाना २२ धम्म प्रतिज्ञा देऊन स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यावेळी ‘ भगवान बुद्ध कि जय ‘ ‘ बाबासाहेब करे पुकार बौद्धधम्म का करो स्वीकार ‘ अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. ज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनुष्य मात्रास नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो असे म्हणाले, तेव्हा त्यांचा गळा दाटून आला व त्यांच्या डोळ्यात अश्रू चमकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणते दुःख झाले असले पाहिजे ? त्यांच्या सारख्या असामान्य निश्चयाच्या या महापुरुषाच्या नेत्रातून का अश्रू यावेत ? डॉ . बाबासाहेबांना असे वाटण्याचा संभव आहे कि, मी ज्ञान मिळविण्याची पराकाष्ठा केली, उत्कृष्ट चारित्र्य ठेवले, वैयक्तिक लाभाची पर्वा केली नाही, अनेक ग्रंथ लिहून भारताच्या ‘ विचारात ‘ भर घातली , ब्रीदाने जीवन घालविले . म्हणजे ज्ञान, शील, सचोटी या बाबतीत मी कोणाहीपेक्षा कमी नसतांना व ३० वर्षे हिंदूधर्म समाजरचनेत राहिलो, पण केवळ माझ्या बांधवाना इज्जतीचा व स्वतंत्र बाण्याचा मार्ग दाखवितो म्हणून हिंदुनी सर्व प्रकारच्या कारवाया करून माझे मार्ग बंद करण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु ठेवले ? त्यांना याबाबत साध्या माणुसकीची पण आठवण राहिली नाही . तेव्हा मी व माझ्या बांधवानी असे कोणते पाप केले कि , त्यांच्यामध्ये राहूनही ते आम्हास सध्या मानुसकीने राहू देत नाहीत. ते काहीही असो ! या अतिशय बिकट परिस्थितीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग आता आपल्या बांधवाना दाखविला, तो पूर्ण ‘ स्वतंत्र ‘ बाण्याचा सर्वोत्कृष्ट आहे यात शंकाच नाही.

संकलन :- मंगेश नामदेव गायकवाड, पुणेशहर

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)