केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! बिहारनंतर आता देशातील 12 राज्यांमध्ये होणार 'एसआयआर' (Big decision of the Central Election Commission! After Bihar, now 'SIR' will be held in 12 states of the country)

Vidyanshnewslive
By -
0
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! बिहारनंतर आता देशातील 12 राज्यांमध्ये होणार 'एसआयआर' (Big decision of the Central Election Commission! After Bihar, now 'SIR' will be held in 12 states of the country)


वृत्तसेवा :- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India - ECI) मोठा निर्णय घेतला. देशभरातील 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदारांच्या यादीच्या विशेष सुधारणा मोहिमेचा (Special Intensive Revision - SIR) दुसरा टप्पा लवकरच राबवला जाणार असल्याची घोषणा आयोगाने सोमवारी दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास आयोजित पत्रकार परिषदेत (27 ऑक्टोबर) केली. बिहारमधील 'एसआयआर' मोहीम यशस्वी झाल्यानंतर आयोगाने 36 राज्य निवडणूक आयुक्तांशी चर्चा करुन हा निर्णय घेतला. 


           पुढील वर्षी ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांमध्ये ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. यात प्रामुख्याने तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांचा समावेश आहे. यापूर्वी, 6 ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी संपूर्ण देशभरात मतदार याद्यांच्या सुधारणेची घोषणा केली होती. बिहारमधील दोन टप्प्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी आयोगाने तिथे 'एसआयआर' मोहीम राबवली. या मोहिमेनंतर मतदार यादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याच्या तक्रारी आल्या. बिहारमधील 'एसआयआर' मोहिमेत सुमारे 65 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. यात पुढे आणखी वगळण्या आणि जोडण्या करण्यात आल्यानंतर सुमारे 80 लाख पात्र मतदारांची नावे वगळण्यात आली. तसेच, संशयित डुप्लिकेट नावे आणि बनावट पत्त्यांच्या नोंदींमध्येही मोठी वाढ दिसून आली. एसआयआर' (SIR) ही निवडणूक आयोगाने राबवलेली एक व्यापक मतदार यादी अद्ययावत (Updation) करण्याची प्रक्रिया आहे. याचा मुख्य उद्देश, घर-घरात जाऊन पडताळणी करणे आणि एक नवीन व अचूक मतदार यादी तयार करणे आहे. या प्रक्रियेद्वारे, केवळ पात्र नागरिक मतदार यादीत समाविष्ट केले जावेत, याची खात्री केली जाते आणि त्याचबरोबर डुप्लिकेट, मृत आणि अपात्र लोकांची नावे यादीतून वगळली जातात. या मोहिमेला 'विशेष'  म्हटले जाते, कारण ती सामान्य वेळापत्रकाबाहेर आयोजित केली जाते. या मोहिमेत दारोदारी जाऊन पडताळणी, क्षेत्रीय तपासणी आणि अनेक नोंदींची क्रॉस-चेकिंग केली जाते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)