रोखठोक - प्रा महेश पानसे.
मूल :- सत्ताधारी पक्षातील का होईना स्थानिक नेते मंडळी लोकोपयोगी, जनहितार्थ मागण्या घेऊन शासन दरबारी मागण्या रेटत आहेत. आंदोलन करण्याचा दम सुद्धा लेखी निवेदनातून भरत आहेत. आपल्याच शासनाला(पक्षाला) जनहितार्थ दम भरण्यासाठी मोठा दम लागतो हे सत्य असले तरी तसा दम मूल शहरातील भा.ज.पा नेते माजी न. प. उपाध्यक्ष नंदुभाऊ रणदिवे व सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेतेद्धय व कायॅकत्याॅंनी दाखविला. भा. ज. पा. स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी न. प. पशाशनास 4 दिवसाआधी निवेदन दिले,सोबत आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला. सत्ताधारी शिवसेना गटाच्या मंडळींनी नळातून गढूळ पाणी येत असल्याबद्दल न. प. ला धारेवर धरले व शिवसेना स्टाईल ने आंदोलनाची धमकी सुद्धा काल - परवा निवेदनातून दिली. शहरात विरोधी पक्ष रग्गड आहे. स्थानिक समस्या सुद्धा कमी नाहीत. विरोधी पक्ष हया समस्या "कॅच" करू शकत नाही ही बाब दुदैवी असली तरी सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नेतेद्धयांना आपल्याच प्रशासना विरोधात एल्गार पुकारावा लागावा ही बाब तरी कुठे सकारात्मक वाटते हा सवाल उपस्थित होतो. व तशी कोपरखळी मूल शहरात मारली जात आहेच.
गत ४ सालापासून न. प. अधिकाऱ्यांच्या हवाली असली तरी सरकार आपल्याच पक्षाचे असताना भा. ज. पा वा शिवसेना ( शिंदे गट) मागण्या पूर्ण न झाल्यास खरंच आंदोलन करेल का? जनता हे न समजण्यापत कमबुद्धी आहे का? याचे चिंतनही न. प. निवडणूकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नेते व कायॅकत्याॅंनी करावा असे त्यांचे शुभचिंतकच बोलताना दिसतात. शिवसेनावाल्यांनी पाणीपुरवठा योजनेत स्वाहा करण्यात आलेल्या 28 खोक्यांची (28 कोटी) वरून चौकशी लावल्यास किंवा सत्ताधारी भा. ज. पा. स्थानिक नेतेद्धयांनी वरिष्ठांकडे हेका धरून न. प. ला मोठा फंड आणून दिला तर जनता जाम खूष होईल. न. प. प़शाशनासोबत चर्चा करण्यात स्थानिक सत्ताधारी मंडळीनी पुढाकार घेतला तरी अनेक समस्या मागीं लागतील हे वेगळे सांगायची गरज नसल्याचे बोलले जाते. तशीही मोकाट जनावरांची समस्या लय जुनी आहे. यात न. प. ला सामाईक सहकार्याची गरज आहे. आंदोलनाची नाही. गढूळ पाणी या विषयावर न. प. स्वत गंभीर आहे. चार दिवसापासूनच न. प. ने स्वताहून पाईपलाईन गाळ सफाई सुरू केली आहे. वार्ड 15 मध्ये हे काम सुरू आहे. शहरात मोकाट जनावरे रस्त्यावर चक्क चंद्रपूर- गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर ठाण मांडून बसायला लागलीत. विदारक चित्र आहे, अनेक समस्यांना वाव देणारी ही बाब आहे. मोकाट जनावरांचे साऱ्याच रस्त्यांवर निर्वासित होणे ही बाब क्षेत्राचे आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार व सत्ताधारी भा. ज. पा. च्या ' स्मार्ट सिटी' या संकल्पनेला तडा देणारी बाब ठरते. मागणी एकदम रास्त अन जनहिताची असली तरी सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनीच आंदोलनाचा ईशारा देणे हा प्रकार आपले अंतर्वस्त्र आपणच फाडणे यात मोडणार नाही का? हा सवाल उपस्थित होतोच. क्षेत्राचे आमदार पक्षाचे आहेत. साधी चर्चा मुख्याधिकारी यांचेशी केली असती तरी काम भारी झाले असते. आपलेच सरकार, आपलेच नेतेगण वरती असताना आंदोलनाचा इश्यू कशाला? मूल- बल्लारपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार माजी कॅबिनेट मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार हे सुद्धा सभागृहात आपल्या सरकारला सुचना करतात, आपल्याच शासनाविरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषा वापरताना दिसत नाही.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या