नौकरी लावून देण्याच्या आमिषाने केली लाखोंची फसवणूक, दोन महिलांनी केली बल्लारपूर पोलिसात तक्रार (Two women filed a complaint with Ballarpur police after being cheated of lakhs with the promise of a job)
बल्लारपूर :- नोकरी लावून देण्याच्या आमिषाने दोन महिलांची तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बल्लारपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. नागपूर येथील आरोपी निलेश कवडुजी मोहुर्ले (४०) व बल्लारपूर येथील आरोपी महिला यांनी संगनमताने ही फसवणूक केली असून तक्रारदार महिला व तिच्या मैत्रीणीला वेळोवेळी धमक्या दिल्याचेही उघड झाले आहे. तक्रारीनुसार, तक्रारदार महिला जयश्री श्रवण दुबे व तिचे पती श्रवण दुबे, तसेच तिचा दिर शुभम मिश्रा (रा. बनारस) हे गोकुळ नगर बल्लारपूर येथे राहतात. आरोपी महिला त्यांच्या शेजारी मागील १५ वर्षांपासून राहते. तसेच, तक्रारदार महिलाची मैत्रीण मिनाक्षी बिरे हिच्याकडूनही तिच्या पतीस नोकरी लावून देण्याच्या नावाखाली ५ लाख रुपये उकळण्यात आले. मात्र ठरल्याप्रमाणे नोकरी देण्यात आली नाही. जेव्हा पीडितांनी पैसे परत मागितले, तेव्हा आरोपी निलेश मोहुर्ले याने “मुंबईचे पोलीस कमिश्नर व नागपूरचे डॉन माझे मित्र आहेत, पोलीसही माझे काही वाकडे करू शकत नाहीत,” अशा प्रकारच्या धमक्या दिल्या. तसेच महिला आरोपी हिनेही "फाशी घेईन, चिठ्ठीत तुमचं नाव लिहीन," अशी आत्महत्येची धमकी देत दबाव टाकल्याचे सांगण्यात आले. जानेवारी २०२३ मध्ये आरोपी महिला व तिचा भाऊ निलेश मोहुर्ले यांनी तक्रारदाराच्या दिराला वेकोलि मध्ये कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले आणि त्यासाठी १२ लाख रुपये मागितले. विश्वासात घेऊन तक्रारदार महिलेकडून हप्त्याने एकूण ५ लाख रुपये उचलण्यात आले. तक्रारदार महिला यांच्या तक्रारीवरुन बल्लारपूर पोलीसांनी अप क्रं ५७१/२५ कलम ३१८(४), ३१५(२), ३(५) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या