वाढदिवसाला लाडक्या बहिणींकडून जाहीर सत्कार, जनतेच्या प्रेमातून मिळते गरिबांची सेवा करण्याची ऊर्जा - आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली भावना व्यक्त (Public felicitation by beloved sisters on birthday, energy to serve the poor is gained from the love of the people - MLA Mr. Sudhir Mungantiwar expressed his feelings)

Vidyanshnewslive
By -
0
वाढदिवसाला लाडक्या बहिणींकडून जाहीर सत्कार, जनतेच्या प्रेमातून मिळते गरिबांची सेवा करण्याची ऊर्जा - आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली भावना व्यक्त (Public felicitation by beloved sisters on birthday, energy to serve the poor is gained from the love of the people - MLA Mr. Sudhir Mungantiwar expressed his feelings)

बल्लारपूर - लोकांचे प्रेम मिळत आहे म्हणूनच सर्वसामान्यांचा आवाज होऊन सभागृहात लढणे शक्य होत आहे. या प्रेमामुळेच गरिबांची सेवा करण्याची ऊर्जा मिळते. या प्रेमाच्या कर्जातून कधीही मुक्त होऊ शकणार नाही, या शब्दांत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. बल्लारपूर येथील माजी नगरसेवक महेंद्र ढोके यांनी आयोजित केलेल्या सोहळ्यात लाडक्या बहिणींनी आ. श्री. मुनगंटीवार यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने जाहीर सत्कार केला. त्यावेळी आ. श्री. मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाला वनविकास मंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, भाजपा बल्लारपूर शहराध्यक्ष रणंजय सिंह, माजी अध्यक्ष काशी सिंह, निलेश खरबडे, समीर केणे, मनीष पांडे, देवेंद्र वाटकर, सतीश कनकम,कांता ढोके, जयश्री मोहुर्ले, रेणुका दुधे, पुनम मोडक, सुवर्णा भटारकर, विद्या देवाळकर, सचिन जाधव, सारिका कनकम, आरती आक्केवार, किशोर मोहूर्ले,विक्की दुपारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  
              आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘माझा वाढदिवस आपण सेवादिन म्हणून साजरा केलात, सर्वांच्या साक्षीने प्रेम व्यक्त केले, त्याबद्दल आभारी आहे. गरिबांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आमचे ध्येय आहे. एखादा कार्यकर्ता अश्यापद्धतीने जनतेची, निराधारांची सेवा करतो. गरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करतो, तेव्हा खूप आनंद होतो. भारतीय जनता पार्टीची खरी संपत्ती महेंद्र ढोके यांच्यासारखे कार्यकर्ते आहेत.’ या प्रेमामुळे अधिक काम करण्याची, शक्तीने सेवा करण्याची ऊर्जा मिळते. जनतेच्या प्रेमातूनच शक्ती मिळत असते. तेच खरे सेवाकार्याचे Stand असते. त्यामुळे तुमच्या प्रेमाचा आशीर्वाद मिळविण्याचा मी आज कार्यक्रमाला उपस्थित राहीलो बहिणींचा आशीर्वाद मिळाला तर जगातील कुठलीही ताकद आपले वाईट करू शकत नाही,अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. १९९८ पासून वाढदिवसाच्या दिवशी मी कुठल्यातरी मंदिरात असतो. यंदाही मी उज्जैनला भगवान महादेवाच्या दर्शनासाठी गेलो होतो. माझ्यासह कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेला भरपूर सुख-समृद्धी देण्याची कामना केली, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717968

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)