बल्लारपूर :- शहरातील लोकमत वृत्तपत्राचे वार्ताहर मंगल झोलबाजी जीवने यांना नुकताच कर्मवीर पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना हा पुरस्कार पत्रकारिता, सामाजिक कार्य, प्रशासन आणि ग्रामीण सेवेत उल्लेखनीय कार्याबद्दल ऑल जर्नलिस्ट ॲन्ड फ्रेंड्स सर्कल या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
म्हणतात ना,म्हणात प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कुठलंही कार्य अवघड नाही. २०२१ मध्ये वयाच्या ६८ व्या वर्षी मंगल जीवने यांनी एल.एल.बी परीक्षा उत्तीर्ण केली. तत्पूर्वी समाजशास्त्र विषयात त्यांनी पर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले होते. त्याची ही अभ्यासू वृत्ती पुढे कायम राहिली. १९८९ मध्ये महाविदर्भ दैनिकाच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेत पाऊल ठेवले. लोकमत समाचार, आणि दैनिक लोकमत मराठी-हिंदी अश्या दोन्ही भाषेतील लिखाण करून समतोल साधला. आपल्या ४५ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. अनौपचारिक आणि सत्याचा वेध घेणारी लेखनशैली हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. मिळालेल्या बहुमानाबदल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या