राष्ट्रीय एड्स नियंत्रण अभियान अंतर्गत रेड रन मॅराथॉन व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन, युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन (Red Run Marathon and Quiz Competition organized under National AIDS Control Mission, youth urged to participate in large numbers)

Vidyanshnewslive
By -
0
राष्ट्रीय एड्स नियंत्रण अभियान अंतर्गत रेड रन मॅराथॉन व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन, युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन (Red Run Marathon and Quiz Competition organized under National AIDS Control Mission, youth urged to participate in large numbers)

चंद्रपूर :- राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत एच.आय.व्ही./एड्स संदर्भात जनजागृतीचे उपक्रम राबविण्यासाठी आरोग्य प्रशासनामार्फ़त विस्तृत रूपरेषा आखण्यात आलेली आहे. या वर्षी देखील जिल्ह्यात जनजागृतीच्या उद्देशाने विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्या निमित्ताने जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, सामान्य रुग्णालयाद्वारे जिल्हाभरात आयसीटीसी व अनुदानित स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 28 जुलै रोजी जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन दुपारी 12 वाजता भवानजीभाई चव्हाण हायस्कूल, मूल रोड,चंद्रपूर येथे करण्यात आले असून या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, तसेच 29 जुलै ला एड्स मुक्त समाज होण्यासाठी समाजाचा सहभाग मिळावा, यासाठी रेड रन (मॅराथॉन) स्पर्धेचे आयोजन जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे. सदर मॅरेथॉन बॅडमिंटन हॉल, जिल्हा स्टेडियम,चंद्रपूर येथून सकाळी 7 वाजता सुरू होईल. यामध्ये देखील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे व जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.
                 तालुकास्तरावर असलेल्या आयसीटीसी केंद्र व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून जिल्हाभरात विविध जनजागृती पर स्पर्धा, पथनाट्य, आरोग्य तपासणी शिबिरे, विविध गटासोबत संवेदीकरण कार्यशाळा वर्षभराच्या कालावधीत आयोजीत करण्यात आलेल्या आहे. तसेच सर्व तालुक्यामध्ये एच.आय.व्ही. बाधितांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाद्वारे ऑनलाईन जनजागृती स्पर्धा घेण्यात येत असून यामध्ये जास्तीत जास्त संख्येने युवा पिढीने भाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यात व ग्रामपंचायत स्तरावर एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थे अंतर्गत कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था, लिंक वर्कर प्रकल्प व मायग्रंट प्रकल्प, नोबल शिक्षण संस्था, ट्रकर्स व मायग्रंट प्रकल्प, संबोधन ट्रस्ट-कोअर प्रकल्प, क्रॉईस्ट हॉस्पिटल- विहान प्रकल्प या संस्थाद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष येथील जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत असून या सर्व कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी, युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)