देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह निमित्त सौ. अमृता फडणवीस उद्या सोमवारी चंद्रपूरात (On the occasion of Devabhau Jankalyan Seva Week, Mrs. Amrita Fadnavis in Chandrapur tomorrow Monday)

Vidyanshnewslive
By -
0
देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह निमित्त सौ. अमृता फडणवीस उद्या सोमवारी चंद्रपूरात (On the occasion of Devabhau Jankalyan Seva Week, Mrs. Amrita Fadnavis in Chandrapur tomorrow Monday)

चंद्रपूर :- आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह अंतर्गत आयोजित विविध सामाजिक उपक्रमांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस उद्या (सोमवार) चंद्रपूर दौर्‍यावर येत असून, त्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. दुपारी ३ वाजता सौ. फडणवीस यांचे चंद्रपूर येथे आगमन होईल. त्यानंतर त्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या कोतवाली वार्ड येथील ‘राजमाता निवास’ या निवासस्थानी भेट देतील. दुपारी ३.३० वाजता २०५५ विद्यार्थ्यांपैकी ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करून सायकल वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ‘राजमाता निवास’ येथेच होणार आहे. दुपारी ४ वाजता सौ. फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनपटावर आधारित चित्रप्रदर्शनीची पाहणी करतील. यानंतर ४.२५ वाजता भिवापूर येथील शिवलिंग परिसरात आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिवलिंगाचे त्यांच्या हस्ते पूजन करण्यात येणार आहे. येथे एक लाख ५५ बेलपत्रे आणि ५५ नद्यांच्या पवित्र जलाने शिवलिंगाचा जलाभिषेक करण्यात येणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)