बल्लारपूर पोलिसांची कारवाई, अमली पदार्थाची तस्करी व विक्री करतांना एकास अटक (Ballarpur police action, one arrested while smuggling and selling drugs)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर पोलिसांची कारवाई, अमली पदार्थाची तस्करी व विक्री करतांना एकास अटक (Ballarpur police action, one arrested while smuggling and selling drugs)

बल्लारपूर :- पोलीस ठाणे बल्लारपूर यांची उल्लेखनिय कामगीरी अशी आहे की, दिनांक-२५/०७/२०२५ रोजी सपोनि मदन दिवटे पोलीस ठाणे बल्लारपुर येथे कर्तव्यावर हजर असतांना खात्रीशीर बातमीदारा कडुन माहीती मिळाली की, सुभाष वार्ड बल्लारपूर येथील राहणारा इसम नामे अरबाज खान हा आपले राहते घरी अवैध रित्या अंमली पदार्थ गांजा विक्रीकरीता बाळगुन आहे. अशी माहिती मिळाल्यावरून सदर मिळालेली माहीती पोनि विपीन इंगळे सा. यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनात तसेच मा. पोलीस अधिक्षक, चंद्रपुर व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा, यांचे परवानगीने मुखबीरने सांगीतलेल्या वर्णनाप्रमाणे अरबाज शफी खान रा. प्रजापती चौक, सुभाष वार्ड, बल्लारपूर याचे घरी रेड करून झडती घेतली असता कि.अं.२७,२०४/- रू. एका पारदर्शक प्लास्टिक पिशवीमध्ये ओलसर गर्द हिरव्या रंगाचा पाने, फुले व बिया संलग्न असलेले कॅनबिस वनस्पती अंमली पदार्थ (गांजा) निव्वळ (गांजा) वजन- २.२६७ कि.ग्रॅम इतके मिळुन आल्याने त्यांचेवर गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन-१९८५ चे कलम-८ (क), २० (ब), ii (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर ची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. मा. अपर पो. अधिक्षक ईश्वर कातकडे, श्री. सुधाकर यादव सा. उपविभागिय पो अधिकारी, राजूरा/चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात पो. निरिक्षक बिपीन इंगळे, सपोनि मदन दिवटे, सपोनि शब्बीर पठाण सफौ. रणविजय ठाकुर, आनंद परचाके, पोहवा. सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडीत, सुनिल कामतकर, पो. अंमलदार शरदचंद्र कारूष, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, विकास जुमनाके सचिन अलेवार, भास्कर चिचवलकर, सचिन राठोड, म.पो. अंमलदार अनिता नायडू, तसेच चालक ग्रेड पोउपनि भास्कर कुंदावार इत्यादी पो. स्टाफ यांनी अतिशय कुशलतेने केली असुन पुढील तपास पोउपनि अभिषेक जनगंमवार हे करीत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)