दहावीच्या परीक्षेत विद्याश्री कॉन्व्हेंटचे शंभर टक्के यश, भार्गवी कायरकर यांनी ९३.८० % गुण घेऊन शाळेत अव्वल (Vidyashree Convent achieves 100% success in 10th exam, Bhargavi Kayarkar tops the school with 93.80% marks)
बल्लारपूर :- विद्याश्री कॉन्व्हेन्टने यंदाही दहावीच्या बोर्ड परीक्षेत शंभर टक्के यश पटकाविले. शाळेच्या मुलींनी प्रथम बाजी मारली. भार्गवी बालमुकुंद कायरकर हिने ९३.८० % घेऊन शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तिला गणितात ९७, विज्ञान ९५, इंग्लिश ९४, हिंदी ९२ आणि मराठी मध्ये ९१ गुण मिळाले. कोणत्याही कोचिंग क्लासेस शिवाय भार्गवी ने हे यश प्राप्त केले. विद्याश्री कॉन्व्हेंट ची विद्यार्थिनी भार्गवी बालमुकुंद कायरकर हिने दहावीच्या परीक्षेत ९३.८० % गुण घेऊन शाळेत अव्वल स्थानावर आली. तसेच दामोदर बोंडे याला ९२.२० % आणि शनमुख वाघाडे ९१.६०% घेऊन द्वितीय व तिसरा क्रमांक पटकविला आहे. विद्याश्री कान्वेंटमधील एकूण ३३ विद्यार्थ्यांनी १० वीची परीक्षा दिली त्यात सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. ज्यामध्ये प्राविण्य वर्गात ४, प्रथम श्रेणीत ९, द्वितीय श्रेणीत २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचे संस्थापक कैलाश खंडेलवाल व शाळेची मुख्याध्यापिका सोनाली आर्य आणि शिक्षकवृन्द यांनी विद्यार्थ्यांचा यशाबद्दल अभिनंदन केले. तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व पालकांना दिले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या