बल्लारपूर :- बल्लारपूर शहर हे एक वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ शहर असून या शहरात मोठ्या प्रमाणावर प्रबोधनात्मक कार्यक्रम होत असतात त्यातही बल्लारपूर पेपर उद्योगाच्या माध्यमातून बुध्द पौर्णिमा समारोह समिती, पेपरमिल बल्लारपूरच्या वतीने पेपरमिल कलामंदिरच्या रंगमंचावर 12 मे 2025 ला बुध्द जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मंडळ नागपूरच्या वतीने " बाबा का जागले ? का रडले ?" या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. शाम गव्हाणे, पोलीस निरीक्षक बल्लारपूर, मा. उदय कुकडे, युनिट प्रमुख, BGPPL, मा. प्रविण शंकर, व्यवस्थापक, (HR), BGPPL, यांची उपस्थिती राहणार आहे तर मार्गदर्शक म्हणून मा. धम्मचारी आर्यानंद, त्रेलोक्य बौध्द महासंघ यांच मार्गदशन राहणार असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन बुध्द पौर्णिमा समारोह समितीच्या वतीने (विश्वास देशभ्रतार, आकाश दुर्गे, निशांत सुटे, मुकेश अलोणे, आनंद वाळके ई द्वारे करण्यात आले आहे.
पाली बुद्ध विहार द्वारा बुद्धजयंती समारोह आयोजित दर वर्षी प्रमाणे या वर्षीही भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार समिती तरफे बुद्ध जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक ११ में २०२५ ला सायं. ठीक ७.०० वाजता "अंगुलिमालाची धम्मदीक्षा" ही लघुनाटिका आशु वनकर आणि सहकारी सादर करनार आहेत. प्राध्यापिका नुतन माळवी, वर्धा यांचे "२१व्या शतकात बौद्ध धम्मापुढ़िल आव्हाने आणि पुढील वाटचाल" या विषयावर मार्गदर्शन होनार आहे. तसेच सोमवार दिनांक १२ में २०२५ ला पहाटे ५.३० वाजता "पाखरे निळ्या नभाचे" म्यूजिकल ग्रुप अमरावती प्रस्तुत बुद्धपहाट या बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सदर कार्यक्रम बुद्ध विहारासमोरिल भव्य पटांगणावर संपन्न होनार आहे. उपरोक्त आयोजित दोन्ही कार्यक्रमाला मोठ्या संख्याने उपस्थित रहावे असे आव्हान तुलसीदास खैरे, प्रकाश देवगडे, अंबादास मानकर, गोकुल वाघमारे यांनी केले आहे
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068



टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या