पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन (Chief Minister's Relief Fund Room inaugurated by the Guardian Minister)

Vidyanshnewslive
By -
0
पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन (Chief Minister's Relief Fund Room inaugurated by the Guardian Minister) 


चंद्रपूर :- प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते आज (दि.1) उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्यासह कक्ष प्रमुख कथा वैद्यकीय अधिकारी डॉ. कविश्वरी कुंभलकर, समाजसेवा अधीक्षक भास्कर शेळके, वरिष्ठ लिपिक दीपक शेळके आदी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष स्थानिक स्तरावर स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णांना या कक्षाची माहिती झाली पाहिजे. गरीब रुग्णांना मुंबईला यासाठी चकरा मारा लागू नये म्हणून, स्थानिक पातळीवरच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर हा कक्ष उभारण्यात आला असून जनतेमध्ये याची जास्तीत जास्त जनजागृती करावी, असे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले. मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष स्थापनेचा उद्देश : समाजातील गरीब गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मदाय रुग्णालय अंतर्गत उपचार मिळवून देणे, महात्मा ज्योतिबा फुले /आयुष्यमान भारत योजना तसेच इतर जनआरोग्य योजनांची माहिती रुग्णांना देणे व त्यांना संदर्भित करणे, आरोग्य संबंधित योजनेमध्ये समाविष्ट होऊ न शकणा-या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मदत करणे. 
          गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा तसेच अर्ज आणि पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण किंवा नातेवाईकांना मंत्रालयात जावे लागू नये, या दृष्टीने या कक्षाची रचना करण्यात आली आहे. 22 फेब्रुवारी 2025 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता आणि 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत या कक्षांच्या प्रभावी कार्यान्वयनासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मुख्यमंत्री सहायता कक्ष काय करणार मदत? 1) मुख्यमंत्री या कक्षामार्फत रुग्ण व नातेवाईकांना अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्जाची सद्यस्थिती, मदतीसाठी पात्र असलेल्या आजारांची माहिती तसेच संलग्न रुग्णालयांची यादी मिळणार आहे. 2) त्यामुळे अर्जदारांना वेळ व पैसे वाचतील आणि मदत तत्काळ पोहोचेल. 3) याशिवाय कक्षातर्फे जनजागृती, रुग्णालयातील भेटी, गरजूंना मदत, आपत्तीच्या ठिकाणी उपस्थिती आणि निधीसाठी देणग्या 4) वाढवण्याचे प्रयत्नही करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना दिलासा मिळणार असून आरोग्य सहाय्यासाठी अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख व्यवस्था उभारण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.                          
         मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी (Email id - aao.cmrf-mh@gov.in) यावर तुम्हाला अर्ज करता येतो. त्यासाठी खालील कागदपत्रे लागतात.
1. अर्ज (विहीत नमुन्यात) 2. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.) 3. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (रु. 1.60 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.) 4. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक 5. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) 6. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे. 7. अपघातग्रस्त रुग्णांसाठी MLC रिपोर्ट आवश्यक आहे. 9. प्रत्यारोपण रुग्णांसाठी ZTCC / शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे. 10. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)