चंद्रपूर :- राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जातनिहाय जनगणनेच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल देशगौरव,पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहे. हा निर्णय सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेले क्रांतीकारी पाऊल आहे, या शब्दात आ. श्री. मुनगंटीवार यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयामुळे वंचित घटकांच्या न्याय हक्कांना बळ मिळेल, योजनांचा योग्य लाभ मिळेल. सर्व जातींना न्याय देण्यासाठी ही जातनिहाय जनगणना उपयोगी ठरेल. या जनगणनेमुळे समतेच्या मूलभूत मूल्यांची भक्कम पायाभरणी निश्चित होईल, असा ठाम विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, जातनिहाय जनगणनेमुळे देशात सामाजिक न्यायाची द्वारे खुले होतील. देशगौरव पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने घेतलेला निर्णय क्रांतिकारी आणि ऐतिहासिक आहे. यामुळे सर्व समाज घटकांसाठी अधिक प्रभावी योजना आखता येणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या