बल्लारपूर :- बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्था द्वारा आयोजित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूरच्या पटांगणावर दिनांक 1 मे 2025 ते 17 मे 2025 पर्यंत सहाव्या वर्गातील व त्यावरील विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क व्हॉलीबॉल समर कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे. बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तसेच चंद्रपूर जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष आणि एन.आय.एस कोच प्रमोद आवते यांच्या मार्गदर्शनाखाली या समर कॅम्पचे आयोजन होत आहे. या समर कॅम्प मध्ये व्हॉलीबॉल प्रशिक्षणाव्यतिरिक्त कराटेचे प्रशिक्षण संजय कुबडे देणार आहेत तसेच मैदानी स्पर्धेविषयी माहिती देण्यात येणार आहे. निःशुल्क व्हॉलीबॉल समर कॅम्प 1 तारखेपासून सकाळी सहा ते आठ व सायंकाळी सहा ते आठ नियमितपणे चालणार आहे. या समर कॅम्पचा लाभ सर्वांनी घ्यावा करिता बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व शाळेच्या क्रीडा शिक्षकांना संपर्क केला असून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. 2024 ला झालेल्या व्हॉलीबॉल समर कॅम्प मध्ये आरुष चव्हाण या खेळाडूची मैदानी स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर निवड झाली तसेच व्हॉलीबॉल मध्ये राज्यस्तरावर निवड झाली. सर्व क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळेचा संघ तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना येथे पाठवावे असे आयोजकांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. या समर कॅम्प करिता खेळाडू प्रज्वल, अभिषेक, दीपांशू ढवळे, सोहम साळवे, कृष्णा यादव, पियुषकुमार शाहा, आरुष चव्हाण, सनी पाल, प्रणय कार्लेकर, विनय पांडे, बघेल, अनिरुद्ध दहीकर, श्रीनिवास उन्नाव, महेंद्र भोंगाडे, ,सुरेश गोडे, खान सर, काशी सिंग, युवराज बोबडे, शांताराम वाडगुरे, रवी अन्सुरी, बलवे, सेंगर, जितेश, विजय डीकोंडावार, कार्तिक खेडेकर, संभाजी कोंडेवाड, चंद्रकांत मैदंबर, अंकुश चव्हाण, प्रफुल नांदेकर, राहुल चनेकर, इत्यादी. सर्व खेळाडू समर कॅम्प यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणार आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या