लातूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना, जात आडवी आली अन् त्या गावात 'सैराट' घडलं...! (A shocking incident in Latur district, the caste was crossed and 'Sairat' happened in that village...!)
वृत्तसेवा :- प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. तो केवळ 18 वर्षाचा. तर तिचं वय जेमतेम 20 वर्षाचं. लातूरच्या टाकळी गावात ते दोघे ही राहात होते. दोघांची घरंही तशी शेजारी शेजारी. त्यामुळे पहिल्यापासून दोघांचा परिचय होता. लहानपणा पासून एकमेकांना पाहीलेलं. ते दोघे जसे तरुण होत गेले तसे ते एकमेकांच्या प्रेमात कसे पडले हे त्यांनाच कळलं नाही. पुढे शिक्षणा निमित्ता दोघे ही लातूरला गेले. तो आयटीआयचं शिक्षण घेत होता. तर ती पदवीचं शिक्षण घेतलं. पण प्रेमामध्ये जात आली अन् तिथचं होत्याचं नव्हतं झालं. हे सर्व चित्रपटाला शोभेल असं वाटत असलं तरी असी घटना प्रत्यक्षात घडली आहे. तीही लातूर जिल्ह्यातील टाकळी या गावामध्ये. लातूर जिल्ह्यात सैराटची पुनरावृत्ती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेम प्रकरणातून बेदम मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचा दोन महिन्याच्या उपचारादरम्यान दुर्वैवी मृत्यू झाला आहे. लातूरपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या टाकळी गावात माऊली उमेश सोट या अठरा वर्षीय तरुणाचं घराशेजारी राहणाऱ्या मुलीशी प्रेम संबंध जुळले.उमेश सोट हा आयटीआयचं शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे. तर पदवीचं शिक्षण घेत असलेल्या मुलीशी त्याचं प्रेम जुळलं होते. त्यांच्या प्रेमाचा अंत अशा दुर्दैवी पद्धतीने होईल असं कुणीही विचार केला नसेल.
माऊली उमाकांत सोट या 18 वर्षीय तरुणाला गावातीलच 10 ते 15 आरोपींनी घरी बोलून जबर मारहाण 27/ 10 /2024 रोजी केली होती. घटनास्थळी पोलीस तब्बल दोन ते तीन तासानंतर आले. मारहाण इतकी भयाण होती की माऊली जागेवरच रक्तबंबाळ झाला होता. जमिनीवर एकचीत पडलेला होता. लोकांनी माऊलीच्या आई वडिलांना निरोप दिला की तुमच्या माऊलीला खूप मारहाण करण्यात आली आहे. हे ऐकून त्यांच्या आईवडीलांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी माऊलीच्या दिशेने धाव घेतली. ते तिथे पोहेचले त्यावेळी माऊली रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याची स्थिती गंभीर होती. त्यामुळे त्याला लातूरला हलवण्यात आलं. मारहाण इतकी जबर होती की माऊली कोमात गेला होता. त्याच्या अंगावर सर्व ठिकाणी वार करण्यात आले होते. पाय फॅक्चर करण्यात आले होते. गेल्या दोन महिन्या पासून त्याच्यावर उपचार सुरू होते. तो मृत्यूशी झुंज देत होता. शेवटी त्याची ही झुंज अपयशी ठरली. त्याचा शेवटी मृत्यू झाला. त्याच्या हत्येचा गुन्हा आता नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन दिवस माऊली शुद्धीवर होता या काळात पोलिसांनी त्याचा जबाब घेतला नाही. त्यानंतर माऊली कोमात गेला . दोन महिने सातत्याने उपचार केल्यानंतर सुद्धा त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. 6 जानेवारी 2025 रोजी माऊलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याच वेळेस जबाब घेतला असता तर आरोपींच्या विरोधात ठोस पुरावा मिळाला असता मात्र पोलिसांनी यात तत्परता दाखवली नाही, असा आरोप आता माऊलीच्या नातेवाईकांनी आणि धनगर समाजाने केला आहे. या प्रकरणात आता लक्ष्मण हाके हे नातेवाईकांची भेट घेणार आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या