बल्लारशाह रेल्वे स्थानकावर मालगाडीच्या धडकेत एका रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू (A railway employee was killed in a collision with a goods train at Ballarshah railway station)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारशाह रेल्वे स्थानकावर मालगाडीच्या धडकेत एका रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू (A railway employee was killed in a collision with a goods train at Ballarshah railway station)


बल्लारपूर :- बल्लारशाह रेल्वे स्थानक मध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याला मालगाडीची धडक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास घडली. बालाजी भानुदास कोटावार (५०) असे मृतक कर्मचाऱ्याचे नाव आहे. बालाजी कोटावार रा. डॉ राजेंद्र प्रसाद वॉर्ड बल्लारपूर हे रेल्वे मधील एस अँड टी विभागात कार्यरत असून ते आज सकाळी ७.३० ते ८ वाजता आपली कामगिरी बजावत असताना फलाट क्रं. ५ मध्ये काझीपेठ एंड कडे त्यांना मालगाडीची धडक बसली. त्यात त्यांचे पाय कटून तीव्र रक्त स्त्राव झाले. त्यांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले. पुढील तपास बल्लारशाह रेल्वे पोलीस चौकी चे पोलीस हवालदार धिरज घरडे, पोशी राजेंद्र फटिंग करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)