बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील त्या दुचाकी अपघातातील एकाचा मृत्यू (One died in that two wheeler accident on Ballarpur-Chandrapur road)
बल्लारपूर :- बल्लारपूर ते चंद्रपूर मार्गांवर रविवारी एका दुचाकीला अपघात झाला होता. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले होते. यातील एकाचा आज बुधवारी चंद्रपूर येथील एका खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यू झालेल्याचे नाव बंडू डांगे (४५) रा. अशोकनगर वार्ड क्रमांक ३ विसापूर ता.बल्लारपूर असे आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील मिलींद प्रकाश गाडगे (४२) व बंडू डांगे (४५) हे दुचाकी क्रमांक एमएच ३४ ए.ई. ७५८४ ने काम आटोपून घराकडे परत येत होते. दरम्यान त्यांची दुचाकी नव निर्मिती एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालय जवळ अनियंत्रीत झाली. विशेष म्हणजे बल्लारपूर शहराबाहेर एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालय, उपकेंद्र आकारास येत आहे. याचे बांधकाम प्रगतीवर आहे. यामुळे बांधकाम कंत्राटदार कंपनीने श्रदेय अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान कडे जाणारा मार्ग बंद केला आहे. विसापूर येथील वाहन चालक याच मार्गाचा उपयोग आवागमन करण्यासाठी करतात.परिणामी वाहन चालकांना विरूद्ध दिशेच्या मार्गांवरून ये- जा करावे लागते. दरम्यान अपघाताच्या घटना घडत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघाताच्या घटना टाळण्यासाठी उपाय योजना करावी, असी मागणी नागरिकांनी केली आहे. भरधाव दुचाकी रस्त्यावर दुभाजकाला जबरदस्त धडकली. या अपघातात दुचाकीस्वार मिलींद गाडगे व बंडू डांगे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारार्थ चंद्रपूर येथील वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मिलींद गाडगे यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. बंडू डांगे याचेवर चंद्रपूर येथील एका खासगी दवाखान्यात उपचार केला जात होता. मात्र, त्याने उपचाराला दाद न देता, बुधवारी प्राण त्यागले. त्याच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या