रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने बल्लारपूर पोलीस निरीक्षकासह कर्मचारी रस्त्यावर हेल्मेट वाहन चालकांचा सत्कार (On the occasion of Road Safety Week Ballarpur police inspector along with staff felicitated helmet drivers on the road)
बल्लारपूर :- महाराष्ट्र पोलीस दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनाने रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त पोलीस निरीक्षक सुनील गाडे हे कर्मचाऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरले आहे. दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरून काळजी घ्यावी. रस्त्यावरील अपघाताच्या घटना टाळण्यासाठी मदत करावी. हेल्मेट वापरणाऱ्या वाहन चालकांचा गुलाब पुष्प प्रदान करून सत्कार करण्यात येत आहे. या अनुषंगाने बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. बल्लारपूर पोलीस ठाणे अंतर्गत शहरातील विशेषता दुचाकी चालकांनी नियमित हेल्मेटचा वापर करावा. पोलीस प्रशासनाने दुचाकी चालकांसाठी हेल्मेट सक्तीचे केले आहे. मात्र, काही दुचाकी चालक याकडे काणाडोळा करत आहे. याबाबत जनजागृती करण्याचा संकल्प बल्लारपूर पोलीस प्रशासनाने केला आहे. या अनुषंगाने बल्लारपूर येथे पेपर मिल परिसर, काटा गेट, जुने बस स्थानक, आठवडी बाजार परिसर, किल्ला वार्ड रस्ता, विसापूर फाटा, विसापूर ते नांदगाव (पोडे) आदी मार्गावर चालणारे दुचाकी चालकांना गुलाब पुष्प प्रदान करून हेल्मेट धारकांचा सत्कार केला. वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, म्हणून जनजागृती करण्यात आली. दुचाकी चालकांनी विना हेल्मेट प्रवास करू नये. रस्ता अपघाताच्या घटना टाळण्यासाठी सहकार्य करावे. जीवन अमूल्य आहे. घरी आहेत मुल बाळ, गतीचे नियंत्रण पाळ, असा संदेश रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त पोलीस देत आहे. यासाठी बल्लारपूर चे पोलीस निरीक्षक सुनील गाडे, गजानन डोईफोडे, गजानन झाडे, राजू बगमारे, गणेश पुसटकर, अजय खरकाटे, स्वप्नील खोब्रागडे, रामराव टेकाम व वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त जनजागृती करत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या