बल्लारपूर :- भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार येथे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कार्यक्रमात बोलतांना भास्कर भगत म्हणाले की ब्रांम्हणासह सर्व समाजातील स्त्रियांना मनुस्मृती नुसार अस्पृषांपेक्षा हिन वागणुक मिळत होती. शिक्षणापासूनही स्त्रिया वंचित होत्या. या व्यवस्थेविरुध्द म.फुलेंनी बंड पुकारले. यात सावित्रीबाई स्वत: शेण माती, चिखलाचा मारा सहन करुन महिलांवर फार मोठे उपकार केले आहेत. यातुन किती महिलांनी सावित्रीबाईंचे उपकारांची परतफेड केली याचे आत्मपरीक्षण करण्याची आज वेळ आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या ऋणातुन सर्वजातीतील स्त्रियां मुक्त झाल्यात का? असा प्रश्न सुध्दा यावेळी उपस्थित केला.याप्रसंगी सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतीमांचे पुजन मान्यवरांच्या हस्ते केले. यावेळी प्रिती हस्ते यांनी मार्गदर्शन केले. वनिताताई नगराळे यांनी कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनू खोब्रागडे यांनी केले. रसिकाताई वाघमारे यांनी कार्यक्रमाचे सुरेख सुत्र संचालन केले. याप्रसंगी परिसरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्याने उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या