बल्लारपूरात आणखी एक तलवार जप्त, विद्यानगर वॉर्डात पोलीस कारवाई दरम्यान तलवारीसह एका व्यक्तीला अटक (Another sword seized in Ballarpur, one person arrested with sword during police operation in Vidyanagar ward)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूरात आणखी एक तलवार जप्त, विद्यानगर वॉर्डात पोलीस कारवाई दरम्यान तलवारीसह एका व्यक्तीला अटक (Another sword seized in Ballarpur, one person arrested with sword during police operation in Vidyanagar ward)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहरात तलवार सापडण्याचे सत्र सुरूच असून बल्लारपूर पोलीसांनी गुप्त माहिती चे आधारे एका आरोपीला तलवार सहित अटक केले. १८ जानेवारी ला बल्लारपूर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध चे अधिकारी व कर्मचारी शहरात अवैध धंद्यावर रेड करण्याकरिता तसेच गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याकरिता टेकडी विभागात गस्त करत असताना त्यांना गुप्त माहिती की विद्यानगर वॉर्ड मध्ये नरेंद्र ब्राम्हणे (४६) लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देश्याने घरी तलवार लपवून ठेवले आहे. पोलीसांनी त्याचे घर गाठत घराची झडती घेतली असता तलवार लपवून ठेवले होते. ते जप्त करून पोलीसांनी आरोपी नरेंद्र ब्राम्हणे याला अटक केले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांचा नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबादास टोपले, सफौ आनंद परचाके, पोलीस हवालदार सत्यवान कोटनाके, रणविजय ठाकुर, सुनील कामटकर, पुरुषोत्तम चिकाटे, संतोष दंडेवार, संतोष पंडित, पोलीस अंमलदार विकास जुमनाके, शरदचंद्र कारुष, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर, लखन चव्हाण, खंडेराव माने, मिलिंद आत्राम, भूषण टोंगे, भास्कर चिचवलकर, महिला पोलीस अनिता नायडू आदींनी केले आहे. आरोपीवर कलम २५, ४ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)