राजुरा :- राजुरा येथील रहिवाशी सर्वोच्च शिक्षित प्रसिद्ध मनोवैज्ञानिक, माजी प्राचार्य, ॲड.डॉ.सत्यपाल रा. कातकर लिखित तिसऱ्या पुस्तकाचे भीमा कोरेगाव शौर्य दिनी १ जानेवारी २०२५ ला समता सैनिक दल शाखा राजुरा द्वारा आयोजित कार्यक्रमात विमोचन तथा लोकार्पण करण्यात आले, ह्यापूर्वी त्यांचे पहिले पुस्तकं संयुक्तरित्या बुद्धिजम अँड दलित सोसियल फिलॉसॉफी अँड ट्रेडिशन मध्ये एज्यूकेशनल प्रॉलिसीस अँड प्रोग्रामस फॉर दलित ह्यावर त्यांनी लिखाण केले ज्यात प्रोफेसर डॉ.सी.डी.नाईक, महू मध्यप्रदेश, डॉ. नितीन राऊत, माजी कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य व डॉ. सत्यपाल कातकर हे तीन लेखक आहेत व सदर पुस्तक कल्पझ पब्लिकेशन, दिल्ली द्वारे प्रकाशित झाले आहे दुसरे स्वलिखित पुस्तक एज्युकेशनल फिलॉसॉफी ऑफ डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक वाण्या पब्लिकेशन, कानपुर व आंबेडकरिजम अँड दलित ऑटोबायोग्राफी हे तिसरे पुस्तक इटरेटिव्ह इंटरनॅशनल पब्लिशर, चिकमंगळरू, कर्नाटक येथून नुकतेच प्रकाशित झाले आहे. राजुरा तहसील मधील चनाखा सारख्या खेडे गावात जन्म घेऊन सुद्धा तिनही पुस्तके आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंग्लिश भाषेमध्ये लिहिली असून तिनही पुस्तके अमेझॉन, प्लिफकॉर्ट वरती उपलब्ध आहेत, विशेष म्हणजे तिनही पुस्तके इंग्लिश मध्ये लिहून राजुरा शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर त्यांनी उंचावले आहे, सदर पुस्तकाचे विमोचन मार्शल ॲड.गौतम खरतडे, यवतमाळ, अविनाश जाधव, सचिव, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, राजुरा, विजय मोरे, अध्यक्ष, बळीराजा नागरी पतसंस्था, राजुरा, भानुदास पोपटे, सर, नेरी आणि मार्शल निवारण कांबळे सर हयांचे उपस्थित विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मार्शल विवेक बक्षी सर ह्यांनी केले. सदर कार्यक्रमास शहरातील बहुसंख्य नागरिक व समता सैनिक दलाचे सैनिक उपस्थित होते. ॲड.डॉ.सत्यपाल कातकर ह्यांच्या पुस्तकाचे विमोचन करण्याचे श्रेय समता सैनिक दल, राजुरा शाखेने घेतले ह्याबद्दल शहरातील नागरिक त्यांचे व लेखकाचे सर्वत्र कौतुक केल्या जाते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या