बल्लारपूर :- रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशनचे अखिल भारतीय अध्यक्ष अजय दुबे हे सलग चौथ्यांदा केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य बनले आहेत. त्यांची केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी वनमंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या शिफारशीवरून नियुक्ती केली आहे. दुबे हे यापूर्वी स्टेशन सल्लागार समिती, DRUCC नागपूरचे सदस्य होते. मध्य रेल्वे मुंबई ZRUCC मधून निवडणुक जिंकून रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्डाचे सदस्य होणारे NRUCC हे विदर्भातील पहिले व्यक्ती होते. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांनी रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव, पालकमंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार, मध्य रेल्वेचे जीएम धरमवीर मीना आणि नागपूरचे डीआरएम मनीष अग्रवाल यांचे आभार मानले आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या