माजी नगरसेविका सारिका कनकम यांच्या प्रयत्नातुन व आ.सुधिर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून लकवाग्रस्त व्यक्तीला मिळाली व्हील चेअर (Through the efforts of former corporator Sarika Kanakam and through MLA. Sudhir Mungantiwar, a paralytic got a wheel chair.)
बल्लारपूर :- माजी नगरसेविका सारिका सतिश कनकम आणि त्यांचे पती सतिश कनकम यांचा प्रयत्नाने बल्लारपूर शहरातील वस्ती विभागातील एका लकवा ग्रस्त इसमाला व्हील चेअर मिळवून दिली. किल्ला वॉर्ड, गोविंद बाबा मंदिर परिसरातील वास्तव्यास असणारे श्री. पद्माकर शंकर गोड्डे हे मागील बऱ्याच वर्षापासून लकवा या शारीरिक व्याधीने ग्रस्त होते. यामुळे त्यांचे चालणे फिरणे अवघड झाले होते. ही बाब त्यांचा कुटुंबियांनी सारिका कनकम आणि सतिश कनकम यांना माहिती दिली. सदर बाब सतिश कनकम यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. यावर प्रतिसाद देत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मदतीचा हात पुढे करत नविन व्हील चेअर ची व्यवस्था केली. पद्माकर गोड्डे आणि त्यांच्या कुटुंबियांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे तसेच माजी नगरसेविका सारिका कनकम आणि सतिश कनकम यांचे आभार मानले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या