डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक. संविधान चौक ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केले जोरदार आंदोलन (Mahavikas Aghadi is aggressive in the case of contempt of Dr. Babasaheb Ambedkar. Violent protest was held from Constitution Square to the steps of the Legislature)

Vidyanshnewslive
By -
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक. संविधान चौक ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केले जोरदार आंदोलन (Mahavikas Aghadi is aggressive in the case of contempt of Dr. Babasaheb Ambedkar. Violent protest was held from Constitution Square to the steps of the Legislature)


नागपूर -: केंद्रीय गृहमंत्री यांनी संसदेत केलेल्या भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी आज नागपूर येथील संविधान चौक ते विधानभवनपर्यंत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार आंदोलन केले. नागपूर येथील संविधान चौक इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घालून, अभिवादन करून महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमकपणे आंदोलनाला सुरुवात केली. हातात बाबासाहेबांचे फोटो घेऊन व घोषणा देत सर्व आमदारांनी संविधान चौकापासून पायी विधानभवनात प्रवेश केला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर येत "बाबासाहेब का ये अपमान नही सहेगा हिंदुस्थान", "जय भीम, जय भीमच्या" जोरदार घोषणा महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या. निवडणुकीपूर्वी - निवडणुकीनंतर आपले महापुरुष आणि देव बदलणे ही भारतीय जनता पक्षाची फॅशन आहे. 


          भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात समतेचा स्वर्ग निर्माण केला, त्यामुळे आम्ही आंबेडकरांचे नाव घेतो आणि घेत राहणार. सामान्य जनतेला आपले अधिकार आणि हक्क देणाऱ्या संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान कधीच सहन केला जाणार नाही अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. भाजपकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला आहे. हा त्यांचाच नव्हे तर संविधान आणि जनतेचा देखील अपमान आहे. बाबासाहेबांनी सर्व समाज घटकातील लोकांना न्याय दिला. जसं आम्हाला वाटतं अपमान झालाय तसं नितीश कुमार, रामदास आठवले आणि सत्तेतील मित्र पक्षांना वाटत नाही का? वाटत असेल तर त्यांनी आंदोलन केलं पाहिजे, रस्त्यावर उतरले पाहिजे. भाजपच्या मनातलं ओठावर आलंय अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधिमंडळ नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली. विधान भवन परिसरात महाविकास आघाडीच्या आमदारांनी आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर घोषणा देत हा परिसर दणाणून सोडला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)