गोंडवाना'त लोककवी मनदादा कर्डक अध्यासन केंद्र दहावे अध्यासन केंद्र: बाबासाहेबांच्या चळवळीला साहित्याची जोड (Gondwana folk poet Vamandada Kardak Adhyasan Kendra 10th Adhyasan Kendra: Link of Literature to Babasaheb's Movement)

Vidyanshnewslive
By -
0
गोंडवाना'त लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्र दहावे अध्यासन केंद्र: बाबासाहेबांच्या चळवळीला साहित्याची जोड (Gondwana folk poet Vamandada Kardak Adhyasan Kendra 10th Adhyasan Kendra: Link of Literature to Babasaheb's Movement)


गडचिरोली :- मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील एक प्रतिभावंत कार्यकर्ते म्हणजे वामनदादा कर्डक होत. वामनदादांचे गीतांच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीला लाभलेले योगदान, गजला आणि त्यांच्या समग्र साहित्याचा अभ्यास, तसेच त्यांनी केलेले समाज प्रबोधन आर्दीचे विचारमंथन होण्याच्या उद्देशाने गोंडवाना विद्यापीठामध्ये लोककवी वामनदादा कर्डक अध्यासनाची सुरुवात करण्यात येत आहे. विद्यापीठातील हे दहावे अध्यासन केंद्र आहे. दहा हजारांपेक्षा अधिक गीतांची रचना करून, बाबासाहेबांचे विचार आणि त्यांची चळवळ ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लेखणीतून घराघरात पोहोचवण्याचे काम केले आहे. वामनदादा कर्डक यांच्या समग्र साहित्याचे संवर्धन, संशोधनासाठी स्वतंत्र ग्रंथालय कक्ष व वाचन कक्ष स्थापन करणे, अप्रकाशित साहित्य संकलित करून प्रकाशित करणे, दुर्मीळ ग्रंथांचे पुनर्मुद्रण करणे, वामनदादादा कर्डक या अध्यासनाचा उ‌द्घाटन सोहळा १९ डिसेंबर रोजी झाला असून या अध्यासनाचे उ‌द्घाटन ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कवी प्रा. डॉ. रवीचंद्र हडसनकर यांच्या हस्ते होणार आहे. या अध्यासनाचा प्रस्ताव डॉ. दिलीप चौधरी यांनी मांडला होता. कर्डक यांच्या साहित्यावर नवीन प्रकाश टाकणाऱ्या शोधनिबंधाच्या पुस्तिका प्रकाशित करणे, वामनदादा कर्डक यांच्या समग्र साहित्याची वेबसाइट तयार करणे, वामनदादा कर्डक यांच्या साहित्याचे वस्तूंचे स्वतंत्र दालन निर्माण करणे, सदर दालनामध्ये वामनदादांच्या मूळ आवाजातील ऑडिओ-व्हिडीओ लाइव्ह व्यवस्था निर्माण करणे, असे विविध उपक्रम या केंद्रांमार्फत राबविण्यात येणार आहेत.


      गोंडवाना विद्यापीठामध्ये सुरू होणारे हे अध्यासन वामनदादांच्या कार्याचे विदर्भातील दुसरे अध्यासन ठरणार असून, या अध्यासनाच्या माध्यमातून गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वामनदादांच्या गीतांच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी दिशा मिळणार आहे. या अध्यासनाच्या माध्यमातून संशोधन, शोधनिबंध, कार्यशाळा, तसेच विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. विविधांगी उपक्रम वामनदादा कर्डक यांच्या समग्र साहित्यावर विविध प्रकारची चर्चासत्रे, परिसंवाद, गजल लेखन कार्यशाळा, व्याख्यानमाला, ऑनलाइन व्याख्याने, विद्यार्थ्यांमध्ये काव्यलेखन, गीतगायन, निबंधलेखन, तसेच गजल गायन स्पर्धेचे आयोजन करणे, वामनदादा कर्डक यांच्या स्मृतिदिनी आंबेडकरी लोककलावंत यांचा सत्कार करणे, लोककलावंतांच्या परफॉर्मिंग कार्यशाळा, तसेच गीत गायन स्पर्धा आयोजित करणे असे विविध उपक्रम या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. विविधांगी उपक्रम वामनदादा कर्डक यांच्या समग्र साहित्यावर विविध प्रकारची चर्चासत्रे, परिसंवाद, गजल लेखन कार्यशाळा, व्याख्यानमाला, ऑनलाइन व्याख्याने, विद्यार्थ्यांमध्ये काव्यलेखन, गीतगायन, निबंधलेखन, तसेच गजल गायन स्पर्धेचे आयोजन करणे, वामनदादा कर्डक यांच्या स्मृतिदिनी आंबेडकरी लोककलावंत यांचा सत्कार करणे, लोककलावंतांच्या परफॉर्मिंग कार्यशाळा, तसेच गीत गायन स्पर्धा आयोजित करणे असे विविध उपक्रम या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)